बांधकाम कामगार योजना : 2025 मधील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी – चार नव्या योजना सुरू, लगेच अर्ज करा

 बांधकाम कामगार योजना : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 2025 मध्ये बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी चार नवीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा उद्देश कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा उंचावणे हा आहे. 18 जून 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या नवीन GR नुसार हे लाभ उपलब्ध होणार आहेत.


कोणत्या आहेत त्या चार योजना?

1. पेटी वाटप योजना

  • ज्या कामगारांना आधी पेटी मिळाली नाही, त्यांनी जिल्हा/तालुका कार्यालयात जाऊन अर्ज भरावा.

  • स्मार्ट कार्ड असणं आवश्यक आहे.

  • जर यापूर्वी अर्ज बाद झाला असेल, तर नवीन अर्ज करून पेटी मिळवता येईल.

2. भांडे वाटप योजना

  • काही काळ बंद असलेली ही योजना जुलै 2025 पासून पुन्हा सुरू होणार.

  • अर्ज जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका केंद्रावर भरता येतो.

  • एजंटद्वारे अर्ज करू नका, कारण मूळ खर्च फक्त 1 रुपये आहे.

3. वस्तूसंच (Essential Kit) वाटप योजना

  • 18 जून 2025 रोजी यासंदर्भात नवीन GR जाहीर.

  • GR मध्ये संपूर्ण वस्तूसंचाची माहिती, कागदपत्रे व लाभाच्या वेळापत्रकाचा समावेश आहे.

  • GR टेलिग्रामवरून डाऊनलोड करता येतो.

4. शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme)

  • फॉर्म भरताना बँक पासबुक कामगाराचेच असणे आवश्यक.

  • विद्यार्थ्याचं पासबुक दिल्यास फॉर्म बाद होऊ शकतो.

  • फॉर्म योग्यरीत्या भरून तपासणीसाठी पाठवावा, मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट कामगाराच्या खात्यात जमा होते.

 

है पन वाचा : राशन कार्ड धारकांना मिळणार दरमहा ₹1000 थेट खात्यात! जाणून घ्या संपूर्ण माहिती – 2025

 


लाभार्थी कोण?

  • बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत व स्मार्ट कार्डधारक मजूर

  • कुटुंबासह रहिवासी व महाराष्ट्रात कार्यरत बांधकाम कामगार

  • शिष्यवृत्ती योजनेसाठी – कामगाराची मुले/मुली जी शाळेत शिकत आहेत


अर्ज कसा करावा?

  1. तालुका किंवा जिल्हा स्तरावरील सुधार केंद्रात अर्ज सादर करा.

  2. अर्ज करताना खालील माहिती ठेवा तयार:

    • स्मार्ट कार्ड

    • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)

    • बँक पासबुक (फक्त कामगाराचे)

    • पासपोर्ट साईझ फोटो

    • शाळा दाखला (शिष्यवृत्तीसाठी)

  3. ऑनलाइन अर्जाची व्यवस्था सध्या नाही.


महत्त्वाच्या तारखा

  • GR जाहीर झाला: 18 जून 2025

  • अर्ज प्रक्रिया सुरू: जून अखेर

  • लाभ वितरण सुरू: जुलै 2025 पासून


पात्रता

  • कामगाराची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी आवश्यक

  • कामगारास वैध स्मार्ट कार्ड असणे गरजेचे

  • मागील योजनांचा लाभ न घेतलेला असावा (काही बाबतीत)

  • शिष्यवृत्तीसाठी, कामगाराच्या मुलाचे नाव शाळेत असावे


महत्त्वाच्या सूचना

  • एजंटच्या माध्यमातून अर्ज करू नका.

  • चुकीचे पासबुक दिल्यास अर्ज नाकारला जाईल.

  • फॉर्म नाकारल्यास सुधारणा करून पुन्हा अर्ज करता येतो.

  • टेलिग्राम चॅनेलवर GR व फॉर्म डाऊनलोडसाठी लिंक दिली जाते.

 

है पन वाचा : लाडकी बहिण कर्ज योजना : लाडक्या बहिणींसाठी सुवर्णसंधी! मिळणार बिनव्याजी १ लाख कर्ज – अर्ज सुरू (2025)

 


शेवटी – बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार मजबूत करावा. कोणतीही मदत किंवा मार्गदर्शन हवे असल्यास, अधिकृत केंद्राशी संपर्क साधा.

Leave a Comment