शेतकरी मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल (https://mahadbtmahait.gov.in) वर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करा:
- महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन:
- तुमचा आधार नंबर व मोबाईल नंबर वापरून खाते तयार करा.
- प्रोफाइल अपडेट करून बँक खाते व शेतजमिनीची माहिती भरा.
- फळबाग योजना निवडा:
- “भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना” निवडून अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक (IFSC कोडसह)
- सातबारा उतारा
- शेतीच्या नकाशाची प्रत
- लाभ घेतलेल्या योजनांचा तपशील (जर असेल तर)
- अर्ज सबमिट करा:
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासा.