घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करणे आता सोपे आणि ऑनलाइन केलं जाऊ शकतं. PMAY-G च्या अधिकृत वेबसाइट pmayg.nic.in वर जाऊन, अर्ज सादर करू शकता. अर्ज प्रक्रिया अशी असू शकते:
- pmayg.nic.in या वेबसाइटवर जाऊन होम पेजवरील Awaassoft मेन्यू मध्ये Data Entry या पर्यायावर क्लिक करा.
- DATA ENTRY For AWAAS हा पर्याय निवडा.
- आपले राज्य आणि जिल्हा निवडून Continue बटणावर क्लिक करा.
- लॉगिन पेजवर युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
- आवश्यक सर्व वैयक्तिक माहिती भरा.
- बँक खात्याचे तपशील भरा.
- जॉब कार्ड आणि SBM नंबरची माहिती भरा.
- अंतिम माहिती भरा आणि अर्ज सादर करा.