अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री आवास योजना 2025 साठी अर्ज करणे सोपे आहे:

  1. ग्रामीण भागातील अर्जदारांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा.
  2. तालुका पंचायत समिती कार्यालयात देखील अर्ज सादर करता येतो.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रती जोडावी.
  4. अर्जदाराने प्रतिज्ञापत्र द्यावे की कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे पक्के घर नाही.

अर्ज कसा करावा?

तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असल्यास, लवकरात लवकर तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज सादर करा.

योजनेविषयी अधिक माहितीसाठी, maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा आपल्या जवळच्या ग्रामपंचायतीला संपर्क साधा.