कुसुम सोलर पंपसाठी अर्ज प्रक्रिया :

शेतकऱ्यांना महाऊर्जा (MEDA – Maharashtra Energy Development Agency) च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. www.mahaurja.com या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. ऑनलाईन अर्ज भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे (७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पाणी स्त्रोत प्रमाणपत्र इ.) अपलोड करा.
  4. अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याचा स्टेटस तपासा.
  5. अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थी हिस्सा जमा करा.
  6. अधिकृत विक्रेत्याकडून सोलर पंप बसवून घ्या.