महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने राबवलेली ‘ladki bahin yojana’ महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती आणि सरकारने दिलेली नवीन अपडेट येथे वाचा.
योजना सुरूच राहणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. विरोधी पक्षांनी या योजनेबाबत अपप्रचार करत योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. परंतु, सरकारने ठाम भूमिका घेत योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची ग्वाही दिली आहे.
है पण वाचा : खताचे नवे दर जाहीर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी (Fertilizer Prices Maharashtra 2025)
Ladki Bahin Yojana लाभार्थींसाठी तपासणी प्रक्रिया
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, सरसकट अर्ज छानणी होणार नाही, परंतु तक्रार प्राप्त अर्जांची तपासणी केली जाईल. जर अर्ज निकषबाह्य आढळला, तर तो अर्ज अपात्र ठरवला जाईल.
अपात्रतेची कारणे:
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक असेल.
- कुटुंबातील कोणीतरी सरकारी नोकरीत असेल.
है पण वाचा : आज तूर बाजार भाव वाढले जाणुन घ्या संपूर्ण माहिती
डिसेंबर महिन्याचा हप्ता
डिसेंबर महिन्यातील सहावा हप्ता यशस्वीरित्या वितरित करण्यात आला आहे. ज्या महिलांना अद्याप हप्ता प्राप्त झालेला नाही, त्यांनी आपला DBT खाते क्रमांक तपासावा.
है पण वाचा : घरकुलचा 2025 लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती
जानेवारी हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता
जानेवारी महिन्यापासून योजनेचा वाढीव लाभ ₹2,100 मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अद्याप अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या महिलांना ₹1,500 चाच लाभ मिळणार आहे.
है पण वाचा : RTE Admission 2025-26 Maharashtra फॉर्म सुरू, वयाची अट? कागदपत्रे व पात्रता ?
योजनेचे फायदे
- महिन्याला ₹1,500 चा आर्थिक लाभ.
- गरीब, शेतकरी, वंचित महिला वर्गासाठी मदतीचा हात.
- महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मोठे पाऊल.
विरोधकांचे आरोप आणि सरकारची भूमिका
विरोधकांनी या योजनेवर टीका करत याला केवळ चुनावी जुमला म्हटलं होतं. कोर्टाने देखील या टीकांना फेटाळलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना दिलेला शब्द पाळत योजना सुरूच राहील, हे स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाची माहिती
- छानणी प्रक्रिया: तक्रार असल्यासच अर्ज तपासला जाईल.
- निकषबाह्य अर्ज: फक्त निकषांनुसार अपात्र अर्ज रद्द केले जातील.
- वाढीव लाभ: अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ₹2,100 चा लाभ मिळण्याची शक्यता.
महिलांसाठी सरकारची बांधिलकी
महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना आणल्या आहेत, त्यात लाडकी बहीण योजना हा महत्त्वाचा उपक्रम आहे. दरमहा दिला जाणारा हप्ता महिलांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी पडत आहे.
तुमचे विचार कळवा
डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालाय का? कमेंट करून नक्की कळवा! पुढील अपडेटसाठी आमच्या marathibatmyalive.com वेबसाइटला भेट द्या.
नवीन अपडेट्ससाठी वाचत राहा आणि शेअर करा!