महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने नुकताच एक नवा आदेश जारी केला आहे – सर्व लाभार्थींनी eKYC करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे.
जर लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केली नाही, तर पुढील हप्ता म्हणजे ₹1500 चा थेट खात्यात जमा होणारा लाभ बंद होऊ शकतो.
ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल आणि तुम्ही ती मॉबाईलवरून घरी बसून सहज करू शकता.
या लेखात आपण पाहणार आहोत — KYC का आवश्यक आहे, प्रक्रिया कशी करावी, कोणाला लागेल आणि यामागचा सरकारचा उद्देश नेमका काय आहे!
लाडकी बहीण योजना लाभार्थींना मोठा झटका!
राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
सर्व लाभार्थींनी eKYC करणं आता अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही ही KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर पुढे मिळणारे ₹1500 चे मासिक लाभ थांबवले जाऊ शकतात.
लाडकी बहिण योजना वेबसाईटवर अपडेट काय आहे?
सरकारी अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in वर आता एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
1 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 6:59 वाजता, वेबसाइटवर हे अपडेट Live करण्यात आले.
तिथे एक नवीन बटण दिसतं –
👉 “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभार्थी eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा.”
है पण वाचा : सोयाबीन दरात 400 रुपयांची तेजी! शेतकऱ्यांना मिळणार हंगामाच्या शेवटी फायदा?
मोबाईलवरूनसुद्धा करू शकता eKYC | Ladki Bahin Yojana KYC Update
तुमचं eKYC करण्यासाठी कुठेही ऑफिसात जाण्याची गरज नाही.
तुम्ही ही प्रक्रिया थेट तुमच्या मोबाईलवरून करू शकता.
✅ लागणारी कागदपत्रे:
आधार कार्ड
मोबाईल नंबर (आधारसोबत लिंक असलेला)
👉 डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करता येईल.
सध्या eKYC सुरू नाही, पण लिंक Live आहे
लक्षात ठेवा – सध्या प्रत्यक्ष eKYC प्रोसेस सुरू झालेली नाही.
पण वेबसाईटवर लिंक Live झालेली आहे आणि काही दिवसांत प्रक्रिया सुरू होणार आहे.
KYC सुरू झाल्यानंतर संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध होणार आहे.
बोगस लाभार्थ्यांना फटका – पात्र लाभार्थ्यांनाच फायदा
सरकारच्या नव्या नियमांमुळे आता बोगस किंवा खोट्या नोंदण्या करणाऱ्यांना वगळलं जाईल.
हे KYC फक्त औपचारिकता नसून, फक्त पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची प्रक्रिया आहे.
जर तुम्ही खरंच पात्र असाल, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे.
महत्वाच्या सूचना
✔️ ही माहिती तुमच्या गावातील, घरातील सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा
✔️ सरकारी वेबसाईटवर वेळोवेळी लॉगिन करून अपडेट तपासा
✔️ KYC सुरू झाल्यावर त्वरित प्रक्रिया पूर्ण करा
✔️ WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन होऊन रोज अपडेट मिळवा – WhatsApp लिंक येथे
है पण वाचा : पीक विमा योजनेचा नवा फॉर्म्युला! शेतकऱ्यांना मिळणार नाही भरपाई? जाणून घ्या सरकारच्या नव्या अटी
उपयुक्त लिंक:
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladkibahin.maharashtra.gov.in
WhatsApp अपडेट ग्रुप: जॉइन करा
YouTube मार्गदर्शक चॅनल: शेती आणि सरकारी योजना
निष्कर्ष- Ladki Bahin Yojana KYC Update
लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची अत्यंत उपयुक्त आणि कल्याणकारी योजना आहे.
पण आता त्यामधील लाभ घेण्यासाठी eKYC अनिवार्य आहे.
तेव्हा वेळ वाया न घालवता, लिंक Live होताच प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचा लाभ सुरक्षित ठेवा.
💬 तुम्हाला काही प्रश्न असल्यास, खाली कॉमेंट करा.
📤 आणि ही माहिती गरजूंना शेअर करायला विसरू नका!