अर्ज प्रक्रिया :

महा DBT अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अर्ज कसा करावा, कागदपत्रे काय असावीत, याबद्दल माहिती खाली दिली आहे.

अर्ज कसा करावा | Mahadbt Schemes 

  • जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात भेट द्यावी किंवा ऑनलाइन अर्ज करावा
  • आवश्यक फॉर्म भरून सबमिट करावा
  • आवश्यक कागदपत्रे जोडावीत
  • अर्ज सादर केल्यानंतर पावती घ्यावी

आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 उतारा (सहा महिन्यांपेक्षा जुना नसावा)
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (अद्ययावत)
  • बँक खात्याचे तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश)
  • शेती जमिनीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • प्रकल्प अहवाल (विहीर, शेततळे इत्यादीसाठी)

अर्ज निवड प्रक्रिया

  • सर्व अर्ज जिल्हा स्तरावर समितीद्वारे छानले जातात
  • लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते
  • शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती आणि शेतजमिनीचे क्षेत्रफळ विचारले जाते
  • शेतकऱ्याची अर्जाची व्यवहार्यता तपासली जाते