pik vima 2024 kadhi milnar : पीक विमा योजनेत मोठे बदल! तीन ट्रिगर हटवल्यामुळे नुकसानभरपाई कमी होणार? 2025 मधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती.
योजना काय आहे?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, गारपीट, आणि पिकांचे नुकसान यासाठी सुरक्षा कवच मानली जाते. पण यंदा या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
नवीन सुधारित पीक विमा योजनेत तीन महत्त्वाचे ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत आणि यामुळे नुकसान भरपाई फक्त “पीक कापणी प्रयोगावर” आधारित दिली जाणार आहे.
लाभार्थी कोण?
या योजनेचे लाभार्थी राज्यातील नियमित पीक कर्ज घेतलेले शेतकरी, तसेच स्वेच्छेने विमा भरलेले शेतकरी आहेत.
कोणते ट्रिगर हटवले गेले?
पूर्वी योजनेत ४ ट्रिगर होते:
मिड सीझन अयशस्वीता (उदा. 21 दिवस पाऊस न पडणे)
स्थानिक नैसर्गिक आपत्ती (उदा. गारपीट, महापूर, वावटळ)
पोस्ट हार्वेस्ट नुकसान (उदा. कापणीनंतर गारपीट, पाऊस)
पीक कापणी प्रयोग (उंबरठा उत्पादन)
➤ आता यापैकी फक्त पीक कापणी प्रयोग उरला आहे, उर्वरित तीन रद्द!
है पन वाचा : शेतकऱ्यांनो सावध! ‘एक रुपयात पीक विमा’ योजना बंद – नवे नियम शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
का झाली वादग्रस्त चर्चा?
राज्याच्या विधिमंडळात यावरून विरोधकांनी जोरदार आवाज उठवला. त्यांनी विचारले:
जर पेरणीच झाली नाही, तर उंबरठा उत्पादनाचे काय?
नैसर्गिक आपत्तीने पूर्ण पीकच वाहून गेलं, तर नुकसान भरपाई कशी?
कंपन्यांनी चुकीचा डेटा दिला, तर त्यांना ब्लॅकलिस्ट का नाही?
विरोधकांचा आरोप:
सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.
तीन ट्रिगर हटवल्यामुळे नुकसानभरपाई न मिळण्याचा धोका.
बोगस कंपन्यांमुळे सर्व शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.
कृषिमंत्र्यांचे स्पष्टीकरण:
“पीक कापणी प्रयोगाच्या आधारे 100% नुकसान भरपाई दिली जाईल.”
“जर पिकाची पेरणी झाली असेल आणि नंतर नुकसान झाले, तर भरपाई नक्की मिळेल.”
“दोषी कंपन्यांची चौकशी करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल.”
“विरोधक, शेतकरी प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल.”
अर्ज प्रक्रिया व पात्रता:
ही माहिती पुढील अधिकृत अधिसूचनेनंतर अपडेट होईल, परंतु सध्याच्या प्रणालीप्रमाणे:
राष्ट्रीयीकृत बँकेतून पीक कर्ज घेतल्यास अर्ज आपोआप होतो.
वैयक्तिक पातळीवर अर्ज करताना:
महाडीबीटी पोर्टल, CSC केंद्र, किंवा संबंधित कृषी कार्यालय यावरून अर्ज करता येतो.
है पन वाचा : पुढील ५ दिवसांत कोकण-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
बँक पासबुक
7/12 उतारा
पीक पेरणीची माहिती
मोबाईल नंबर
महत्त्वाच्या तारखा:
पेरणीच्या 10 दिवसांत अर्ज करणे आवश्यक
नुकसान झाल्यानंतर 72 तासांत रिपोर्टिंग
अधिकृत लिंक:
1) https://mahadbt.maharashtra.gov.in
2) https://pmfby.gov.in
शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं
नवीन योजनेत तीन ट्रिगर हटवल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
पीक कापणी प्रयोग हे एकमेव निकष असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळण्याची शंका.
तुमचं पीक खरंच नुकसान झालं असेल, तर ते पक्कं नोंदवा व अधिकार्यांकडे वेळेत सादर करा.
निष्कर्ष:
पीक विमा योजनेतील बदलांचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी यावर पुन्हा विचार करण्याची मागणी केली असून, शेतकऱ्यांच्या मतांचा विचार करून निर्णय घेण्यात यावा, अशी एकंदर मागणी आहे.
तुमचं मत कमेंटमध्ये सांगा – नवीन पीक विमा योजनेत झालेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांना फटका बसेल का?