तार कंपाउंड योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहे. ऑनलाईन अर्जाची सुविधा सध्या उपलब्ध नाही. अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- कृषी केंद्र किंवा पंचायत समितीकडे जा:
ज्या गावात किंवा तालुक्यात शेतकरी राहतो, तेथील कृषी केंद्र किंवा पंचायत समितीकडे अर्ज उपलब्ध आहे. - अर्ज भरणे:
अर्ज व्यवस्थित व अचूक भरा. त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, आणि जमिनीची माहिती द्या. - कागदपत्रे जोडणे:
आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, सातबारा उतारा, वनविभाग प्रमाणपत्र इ.) अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. - अर्ज सादर करणे:
अर्ज पंचायत समिती किंवा कृषी केंद्रात जमा करा. जमा केल्यानंतर अधिकाऱ्याकडून पावती मिळवा.