महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा:
महाराष्ट्र राज्य सरकारने महाडीबीटी (MAHADBT) पोर्टल तयार केले आहे, जिथे शेतकऱ्यांना विविध शेतकरी योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा आहे. ट्रॅक्टरचलित मळणी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान मिळविण्याचा अर्ज देखील या पोर्टलवर करावा लागतो.नवीन नोंदणी किंवा लॉगिन:
जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर आधीच नोंदणी केली असेल, तर तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करू शकता. जर तुम्ही नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आधार OTP चा वापर करून लॉगिन सुद्धा करता येतो.ऑनलाइन अर्ज सादर करा:
नोंदणी आणि लॉगिन झाल्यावर तुम्हाला अर्ज भरण्याचा पर्याय दिसेल. तुम्हाला या अर्जात आवश्यक असलेल्या सर्व माहिती भरून सबमिट करावी लागेल. अर्ज सादर केल्यानंतर, योजनेसाठी लॉटरी सिस्टम राबवली जाते. जर तुमचे नाव लॉटरीत आले तर तुम्हाला अनुदान मिळेल.