फवारणी पंप योजना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. महाडीबीटी पोर्टलला भेट द्या महाडीबीटी पोर्टलला भेट देण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या लिंकचा वापर करा.
  2. लॉगिन किंवा नवीन खाते तयार करा
    • जर तुमचं आधीपासून अकाउंट असेल, तर युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
    • जर अकाउंट नसेल, तर नवीन अर्जदार नोंदणी ऑप्शनवर क्लिक करून अकाउंट तयार करा.
  3. फवारणी पंपासाठी योजना निवडा लॉगिन केल्यानंतर, ‘कृषी यांत्रिकीकरण’ विभागात जा.
    • तिथे फवारणी यंत्र अवजार योजना निवडा.
    • मुख्य घटकात पीक संरक्षण अवजारे हा ऑप्शन निवडा.
  4. मशीन प्रकार निवडा फवारणी पंप प्रकार निवडताना, तुमच्या गरजेनुसार खालील दोन पर्याय असतील:
    • बॅटरी संचलित फवारणी पंप
    • कापूस किंवा गळीत धान्यासाठी पंप यापैकी योग्य पर्याय निवडा.
  5. अर्ज सादर करा सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि शेवटी अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा.
  6. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा अर्ज पूर्ण केल्यानंतर, काही प्रकरणांमध्ये पेमेंट करणे बंधनकारक असते. पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, किंवा UPI चा वापर करू शकता.