पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करू शकता:
वेबसाइटवर लॉगिन करा:
- सर्वप्रथम, तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर ओपन करावा लागेल.
- त्यानंतर “प्रधानमंत्री फसल विमा योजना” सर्च करा.
- ‘प्रधानमंत्री फसल विमा योजना’ या लिंकवर क्लिक करा.
- इथे तुम्ही तुमची भाषा निवडू शकता. मराठी भाषेचा पर्याय निवडा.
- “फॉर्मर कॉर्नर” या ऑप्शनवर क्लिक करा.
- “शेतकरी करिता लॉगिन करा” या ऑप्शनवर क्लिक करा.
अर्जाची स्थिती तपासा:
- जर तुम्हाला तुमचा पीक विमा अर्ज सापडला नाही, तर तुम्ही “अर्जाची स्थिती” वर क्लिक करून आपला अप्लिकेशन नंबर टाकू शकता.
- कॅप्चा कोड टाका आणि “चेक स्टेटस” वर क्लिक करा.
- यामुळे तुम्हाला अर्जाची स्थिती दिसेल की तो पेंडिंग आहे की मंजूर झाला आहे.
लॉगिन करून तपासा:
- “फॉर्मर कॉर्नर” वर क्लिक केल्यानंतर, “शेतकरी करिता लॉगिन करा” या ऑप्शनवर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर टाकून, कॅप्चा टाकून ओटीपी मागवा.
- ओटीपी आल्यानंतर, ते टाकून “सबमिट” करा.
- तुम्ही लॉगिन झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा पिक विमा क्लेम दिसेल.