Petrol Diesel Prices : इस्रायल आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. इस्रायलने काल इराणवर हल्ला केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कमी होत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत आता अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामागे आखाती देशांमध्ये (मध्य पूर्व) वाढलेला तणाव हे प्रमुख कारण आहे.
इस्रायलने इराणवर हल्ला केल्याच्या बातमीनंतर शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्क्यांनी मोठी वाढ नोंदवली गेली. काही महिन्यांनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. आता भारतावर त्याचा काय परिणाम होणार? पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का? चला पाहूया सविस्तर…
है पन वाचा : सौरचलित फवारणी यंत्र अर्ज कसा करावा? | 100% अनुदानावर
तेलाच्या किमतीचा भडका! | Petrol Diesel Prices
शुक्रवारी Brent Crude Futures चे दर $5.29 किंवा 7.63% ने वाढून $74.65 प्रति बॅरल झाले.
West Texas Intermediate (WTI) क्रूड तेलाचे दर $5.38 किंवा 7.91% ने वाढून $73.42 प्रति बॅरल झाले.
ही वाढ 2 एप्रिलनंतरची सर्वात मोठी वाढ आहे.
हल्ला का झाला आणि त्याचा परिणाम काय?
इस्रायलने हा हल्ला इराणच्या अण्वस्त्र पायाभूत सुविधा, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखाने, आणि लष्करी क्षमता नष्ट करण्यासाठी केला.
इराणमधील माध्यमांनी सांगितले की, तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले.
अमेरिका इराणसोबत अणुबॉम्ब रोखण्याबाबत करार करण्याच्या तयारीत होती. पण इस्रायलने या दरम्यान हल्ला केला.
भारतावर काय परिणाम होईल? | Petrol Diesel Prices
भारत आपली ८५% crude oil गरज आयात करत असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढू शकतात.
पेट्रोल-डिझेल महागणार?
आयात करताना भारताला जास्त डॉलर मोजावे लागतील.
याचा थेट परिणाम म्हणून देशांतर्गत Petrol-Diesel Rates वाढू शकतात.
वाहतूक खर्च वाढल्यामुळे Food, Goods आणि Services वर महागाईचा दबाव येईल.
लॉजिस्टिक्स आणि उत्पादन क्षेत्रांना मोठा फटका बसेल.
रुपयावर परिणाम
अधिक डॉलर्स खर्च करावे लागल्याने भारताची Trade Deficit वाढेल.
Rupee weak होण्याची शक्यता निर्माण होईल.
डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमजोर होऊ शकतो.
शेअर बाजार आणि गुंतवणूकदार | Petrol Diesel Prices
भू-राजकीय तणावाचा परिणाम Oil & Gas Sector, Share Market वर होतो.
गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.
तेल कंपन्यांचे शेअर्स वधारू शकतात; पण Aviation आणि Logistics कंपन्यांवर प्रेशर येईल.
तेलाची किंमत आणखी वाढेल का?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इराण-इस्रायल तणाव वाढला किंवा इतर देश सहभागी झाले, तर Crude Oil Price $100 प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतो.
Iran चा तेल पुरवठा बाधित झाल्यास हा दर झपाट्याने वाढू शकतो.
Bacchu Kadu Uposhan : बच्चू कडूंचं अन्नत्याग उपोषण चौथ्या दिवशी बच्चू कडूंची लढाई सरकारविरुद्ध
निष्कर्ष
इस्रायल-इराण तणाव वाढत असल्याने जागतिक बाजारात मोठी खळबळ.
Crude Oil Price मध्ये मोठी उसळी.
भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता.
महागाई, रुपयाची कमजोरी, आणि आर्थिक प्रेशर वाढणार.
महत्वाचे मुद्दे संक्षेपात – Petrol Diesel Prices
इस्रायलने इराणवर हल्ला केला.
Brent Crude दर 7.63% नी वाढला.
भारतावर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा धोका.
Transport, Logistics वर परिणाम.
रुपया कमकुवत होण्याची शक्यता.
Inflation चा धोका वाढला ( Petrol Diesel Prices ) .
✍️ Adesh Nirmale
🌐 marathibatmyalive.com
📩 marathibatmyalive24@gmail.com