तूर लागवड माहिती : तूर हे पीक कोरडवाहू आणि अवर्षणप्रवण भागात शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. योग्य वाणांची निवड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तुरीचे उत्पादन १५ ते २० क्विंटल प्रति एकर इतकं मिळू शकतं. मराठवाडा भागात अनेक शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या अधिक उत्पादन घेतले आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तुरीच्या काही उच्च उत्पादनक्षम वाणांची शिफारस केली आहे. हे वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले असून उत्पादनाच्या दृष्टीनेही उत्कृष्ट आहेत.
चला तर पाहूया तुरीचे टॉप तीन वाण आणि त्यांची सविस्तर माहिती.
है पन वाचा : पीएम किसान योजना मोठी अपडेट अपात्र शेतकऱ्यांकडून हफ्त्यांची वसुली सुरू!
१) BDN-711 (पांढरी) | तूर लागवड माहिती
कालावधी (दिवस): १५० ते १५५
प्रति एकर बियाणे: ५ ते ६ किलो
सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर): ७ ते ८
वैशिष्ट्ये:
या वाणाचे दाणे पांढऱ्या रंगाचे असतात.
कोरडवाहू लागवडीसाठी उपयुक्त.
मर (Wilt) व वांझ (Sterility mosaic) रोगास प्रतिकारक्षम ( तूर लागवड माहिती ) .
२) BDN-716 (लाल)
कालावधी (दिवस): १६५ ते १७०
प्रति एकर बियाणे: ५ ते ६ किलो
सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर): ८ ते ९
वैशिष्ट्ये: | तूर लागवड माहिती
या वाणाचे दाणे लाल रंगाचे असतात.
शेंगांचा रंग पूर्ण हिरवा असतो.
मर आणि वांझ रोगास प्रतिकारक्षम.
Hastlikhit 7/12 : मूळ आणि हस्तलिखित सातबाऱ्यात फरक आढळल्यास महसूल विभागाची मोठी कारवाई
३) BDN-2013-41 (गोदावरी) (पांढरी)
कालावधी (दिवस): १६० ते १६५
प्रति एकर बियाणे: ५ ते ६ किलो
सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर): १० ते ११
१०० दाण्याचे वजन: ११ ग्रॅम
वैशिष्ट्ये:
पांढऱ्या रंगाचे मोठ्या आकाराचे दाणे.
महाराष्ट्रात आजपर्यंत प्रसारित झालेल्या वाणांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पादन देणारा वाण म्हणून ओळख.
शेवटी महत्त्वाचे – तूर लागवड माहिती
वरील तीन वाण शेतकऱ्यांसाठी उच्च उत्पादन, कमी खर्च, आणि रोगप्रतिकारक क्षमता यामुळे अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील हवामान व पाण्याची उपलब्धता पाहून योग्य वाण निवडल्यास निश्चितच जास्त उत्पादन घेता येईल.
🔁 लेख शेअर करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांनाही याचा फायदा होऊ द्या ( तूर लागवड माहिती ) .