फवारणी पंप योजना : 100% अणूदानावर फवारणी पंप असा करा अर्ज

फवारणी पंप योजना : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी एक खास योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 100% अनुदानावर म्हणजेच मोफत सौरचलित फवारणी पंप देण्यात येणार आहेत.

📝 या योजनेसाठी अर्ज महाडीबीटी (Mahadbt) पोर्टल वरून करावा लागणार आहे. ज्यांना मोफत सोलर फवारणी पंप हवा आहे त्यांनी त्वरित अर्ज भरावा लागेल. कारण आता सरकारनं अर्ज प्रक्रिया बदलली आहे.


जुनी व नवीन निवड प्रक्रिया | फवारणी पंप योजना

पूर्वी ही योजना लॉटरी पद्धतीने राबवली जात होती. मात्र आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने ही योजना दिली जाते. त्यामुळे जो आधी अर्ज करेल, त्यालाच योजनेचा लाभ मिळेल.

है पन वाचा : सूक्ष्म सिंचनाची सुवर्णसंधी शेतकऱ्यांनो! मिळवा 90% पर्यंत अनुदान थेट खात्यात


📱 मोबाईलवरून अर्ज प्रक्रिया (Step by Step)

या अर्जाची प्रक्रिया मोबाईलवरून घरी बसून करता येते. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:

1️⃣ Mahadbt पोर्टल ओपन करा

👉 डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 पेज स्क्रोल करा
👉 “अर्जदार लॉगिन” ऑप्शनवर क्लिक करा

2️⃣ लॉगिन करा | फवारणी पंप योजना

👉 वैयक्तिक शेतकरी ऑप्शन निवडा
👉 तुमचा Agristack Farmer ID टाका
👉 “OTP पाठवा” बटणावर क्लिक करा
👉 रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP टाका
👉 “OTP तपासा” बटणावर क्लिक करा

3️⃣ अर्ज करा

👉 “घटकासाठी अर्ज करा” ऑप्शनवर क्लिक करा
👉 “कृषी यांत्रिकीकरण” या मुख्य घटकाच्या समोर “बाबी निवडा” वर क्लिक करा

4️⃣ घटक व तपशील निवडा | फवारणी पंप योजना

👉 “कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य” निवडा
👉 “मनुष्यचलित अवजारे” निवडा
👉 “पीक संरक्षण अवजारे” निवडा
👉 “सौरचलित नप्सक फवारणी पंप” या पर्यायावर क्लिक करा

Sbi Home Loan Interest Rate : SBI ची मोठी घोषणा: Home Loan वर व्याजदरात कपात, EMI आता आणखी कमी


अर्ज सबमिट करण्यापूर्वी

👉 डिक्लेरेशन टिक करा :
“मी पूर्वसंमती शिवाय कृषी यंत्र खरेदी करणार नाही.”
👉 “जतन करा” बटणावर क्लिक करा
👉 घटक यशस्वीरित्या समाविष्ट झाल्याचा मेसेज येईल
👉 फक्त फवारणी पंपसाठी अर्ज करायचा असल्यास “No” वर क्लिक करा


अर्ज सादर करा | फवारणी पंप योजना

👉 “अर्ज सादर करा” बटणावर क्लिक करा
👉 Popup Window मध्ये “OK” करा
👉 अर्ज सादर करण्यापूर्वी पुन्हा एकदा डिक्लेरेशन वाचून “Accept” करा
👉 अर्ज सादर करा बटणावर क्लिक करा


शुल्क व अटी

👉 जर तुम्ही एका वर्षात पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर ₹23.60 शुल्क भरावे लागेल
👉 जर यावर्षी आधीच अर्ज केला असेल, तर शुल्क लागणार नाही


निवड झाल्यानंतर काय?

👉 अर्ज सादर झाल्यावर, निवड झाल्यास मोबाईलवर SMS येईल
👉 गावातील कृषी सहायक व कृषी ऑफिस मार्फत पंप दिला जाईल


✅ महत्त्वाची टीप – फवारणी पंप योजना

👉 अर्ज लवकर भरा, कारण पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्याला प्राधान्य
👉 मोबाईलवरून घरबसल्या प्रक्रिया सोपी आहे
👉 सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचा

Bandhkam Kamgar Scholarship : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना


📢 शेतकरी मित्रांनो, ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, तर इतर शेतकऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा. मोफत फवारणी पंपाचा लाभ घ्या आणि खरीप हंगामात आपल्या उत्पादनात वाढ करा ( फवारणी पंप योजना ).

Leave a Comment