शेतकरी मित्रांनो, सरकारकडून मोठी खुशखबर!
टोकन यंत्र 2025 : महाराष्ट्रातील लघु आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाची योजना राबवली जात आहे. आता टोकन यंत्र (Tokan Yantra) शेतकऱ्यांना फुकट किंवा अनुदानावर दिले जाणार आहे. या यंत्रामुळे लागवडीचं काम जलद आणि सोपं होणार असून, केवळ काही मिनिटांत शेतात पेरणी करता येणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
शेतकऱ्यांची कामाची वेळ व श्रम वाचवणे
लागवडीची गती वाढवणे
हरभरा, मका, सोयाबीन यासारख्या पिकांची सहज लागवड
लघु शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन सुधारित तंत्रज्ञानाची सुविधा देणे
टोकन यंत्रासाठी किती अनुदान मिळते?
शेतकऱ्यांची जमीन | मिळणारे अनुदान |
---|---|
कमी जमीनधारक | ₹10,000 पर्यंत |
मोठी जमीन | ₹8,000 पर्यंत |
हे अनुदान महाडीबीटी पोर्टल द्वारे थेट खात्यात जमा केलं जातं.
है पन वाचा : 2025 मध्ये पोस्ट ऑफिसची SCSS योजना ठरणार सर्वात फायदेशीर – जाणून घ्या संपूर्ण माहिती
पात्रता व आवश्यक कागदपत्रे
पात्रता:
महाराष्ट्रातील रहिवासी असणे
वैयक्तिक शेतकरी नोंदणी असणे
शेती भूधारक असणे
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
7/12 उतारा
बँक पासबुक
मोबाईल नंबर
शेतकरी कार्ड नंबर (Farmer ID)
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा कराल?
➤ पहिला टप्पा: लॉगिन प्रक्रिया
https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करा.
मोबाईलवर ब्राउजर वापरत असाल, तर “Desktop site” निवडा.
मुख्यपृष्ठावर “अर्जदार लॉगिन” → “वैयक्तिक शेतकरी” निवडा.
तुमचा शेतकरी कार्ड नंबर टाका.
“OTP पाठवा” क्लिक करा → OTP टाका आणि लॉगिन करा
➤ दुसरा टप्पा: अर्ज भरणे
लॉगिन झाल्यानंतर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
“कृषी यंत्रीकरण” विभाग निवडा.
“यंत्रसामग्री अवजारे” → “टोकन यंत्र” पर्याय निवडा.
मशीनचा प्रकार निवडा → डिक्लरेशन वाचा → ✔ चिन्ह लावा.
“जतन करा” क्लिक करा.
है पन वाचा : लग्नानंतर दरमहा 10,000 रुपये कमवा! पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेचा 2025 मध्ये घ्या जास्तीत जास्त फायदा
➤ तिसरा टप्पा: अर्ज सादर करा
पुन्हा मुख्यपृष्ठावर या.
“अर्ज सादर करा” पर्याय निवडा.
संपूर्ण माहिती एकदा पुन्हा तपासा.
₹23.60 एवढे फी भरा.
“Submit” बटण क्लिक करा.
टोकन यंत्राचे फायदे
एका माणसाला 1 एकर क्षेत्र 2 तासांत पेरता येते
वेळ आणि मजुरी दोन्हीची बचत
बियाण्यांचा अपव्यय टाळतो
रोपांची सम प्रमाणात लांबी राखतो
महत्वाची टीप:
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. कोणतीही फी घेतली जात नाही, फक्त ₹23.60 ही अर्ज प्रक्रिया फी आहे.
अधिकृत वेबसाइट
महाडीबीटी पोर्टल: mahadbt.maharashtra.gov.in
निष्कर्ष:
शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला फुकट टोकन यंत्र हवे असेल तर ही संधी गमावू नका. लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमचं शेतकऱ्यांचं जीवन सोपं करा. सरकारच्या या उपक्रमाचा नक्की फायदा घ्या!
है पन वाचा : 2025 पासून रेशन मोफत मिळणार नाही? नवीन नियम जाहीर
लेखक: अदेश निर्मळे | www.marathibatmyalive.com