मोठा निर्णय : आता फक्त हमीपत्राने मिळणार रेशन कार्डवर धान्य | Antyodaya Ration Card Update 2025

Antyodaya Ration Card Update 2025 : महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग योजना, विधवा योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना अशा अनेक शासकीय योजनांचे लाभार्थी आता सहजपणे अंत्योदय शिधापत्रिका (Antyodaya Ration Card) काढू शकतात आणि धान्य घेऊ शकतात.

आत्तापर्यंत धान्य मिळवण्यासाठी किंवा नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी 15,000 रुपयांचा उत्पन्न दाखला सादर करावा लागत होता. परंतु आता शासनाच्या नवीन निर्णयानुसार ही अट रद्द करण्यात आली आहे.


आता काय लागणार?

  • धान्य चालू करण्यासाठी उत्पन्न दाखल्याची गरज नाही.

  • फक्त एक साधं हमीपत्र (Undertaking Form) भरून तहसील कार्यालयात सादर केलं की तुमच्या रेशन कार्डवर धान्य सुरू होईल.

  • हमीपत्रासोबत खालील कागदपत्रं द्यावी लागतील:

    • आधार कार्ड (सर्व कुटुंब सदस्यांचे)

    • जुनी शिधापत्रिका / ऑनलाइन PDF कॉपी

    • कुटुंब प्रमुखाचा फोटो

    • हमीपत्रामध्ये नाव, पत्ता, उत्पन्न (१५,००० रुपये) आणि कुटुंब सदस्यांची माहिती

 

है पण वाचा : संजय गांधी निराधार योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार? ताजी माहिती येथे वाचा 

 


हमीपत्रामध्ये काय भरायचं?

हमीपत्रात तुम्हाला साध्या माहिती द्यायच्या आहेत:

  • अर्जदाराचे मराठी व इंग्रजी नाव

  • राहण्याचा पत्ता

  • कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, लिंग, आधार क्रमांक

  • एकूण उत्पन्न – फक्त ₹15,000 नमूद करायचे

 

 


“इष्टांग संपलंय” असं सांगितलं तर काय करायचं?

अनेक वेळा तहसील कार्यालयात जाऊन लाभार्थ्यांना सांगितलं जातं की धान्यासाठी इष्टांग शिल्लक नाही. पण लक्षात ठेवा –

  • सरकारने आधीच अशा रेशन कार्डांची तपासणी सुरू केली आहे जे खरेदीयोग्य नाहीत तरी धान्य घेत आहेत.

  • चुकीच्या पद्धतीने घेतलेली शिधापत्रिका रद्द करण्यात येत आहे.

  • जर तुम्हाला धान्य नाकारलं गेलं, तर तुम्ही RTI (माहितीचा अधिकार) अंतर्गत मागणी करू शकता की मागील काही महिन्यात कोणाला धान्य वाटप केलं.


लाभ कोणाला होणार?

या निर्णयाचा फायदा मुख्यतः खालील लाभार्थ्यांना होणार आहे:

  • संजय गांधी निराधार योजना लाभार्थी

  • दिव्यांग नागरिक

  • विधवा महिला

  • वृद्धापकाळ योजना लाभार्थी

  • श्रावणबाळ योजना लाभार्थी

  • आणि इतर शासकीय योजनांचे लाभार्थी

 

है पण वाचा : नमो शेतकरी सातवा हप्ता : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे? संपूर्ण अपडेट

 


महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा

  • उत्पन्न दाखल्याची अट पूर्णपणे रद्द केली आहे.

  • हमीपत्र आणि काही बेसिक कागदपत्रं दिल्यावर धान्य मिळणार हे तुमचं हक्काचं आहे.

  • तहसील कार्यालयात धान्य नाकारल्यास कायदेशीररीत्या माहिती मागवता येईल.


निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय हजारो कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. अनेक वर्षं उत्पन्न दाखल्यामुळे अडचणीत अडकलेले लाभार्थी आता सहजपणे धान्य मिळवू शकतात.

 जर तुम्ही सुद्धा या योजनांचे लाभार्थी असाल, तर लवकरात लवकर हमीपत्र भरून तहसील कार्यालयात जमा करा आणि अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ घ्या.


 माहिती सर्वत्र शेअर करा जेणेकरून प्रत्येक गरजवंत लाभार्थीला या निर्णयाचा फायदा होईल.

Leave a Comment