बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 2025: अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती

बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 2025 ही महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठीची एक महत्त्वाची शैक्षणिक योजना आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.

या लेखात आपण जाणून घेणार आहोत:
✅ अर्ज प्रक्रिया (Step-by-step)
✅ लागणारी कागदपत्रे
✅ कोण अर्ज करू शकतो
✅ अर्ज करताना घ्यायची काळजी


 बांधकाम कामगार स्कॉलरशिप 2024 साठी पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण असणं आवश्यक आहे:

  • अर्जदार नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा.

  • रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह आणि रिन्युअल केलेलं असावं.

  • फक्त नोंदणीकृत कामगाराच्या मुलांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.

  • विद्यार्थी सदर शैक्षणिक वर्षात शिकत असावा.


लागणारी कागदपत्रे (Documents Required)

ऑनलाईन फॉर्म भरताना खालील कागदपत्रे तयार ठेवा:

  1. 75% उपस्थितीचे प्रमाणपत्र

  2. चालू वर्षासाठीचे बोनाफाईड प्रमाणपत्र

  3. विद्यार्थ्याचे आधार कार्ड

  4. शाळेची शेतारपत्रिका (School Letterhead with Details)

टीप: वेगवेगळ्या योजनेसाठी काही कागदपत्रात फरक असू शकतो.

है पन वाचा : दरवर्षी ₹२४,००० जमा केल्याने तुम्हाला ११ लाखांपेक्षा जास्त मिळतील, संपूर्ण माहिती आणि व्याजदर जाणून घ्या


ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – Step by Step

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाइट

2. Apply Online for Claim वर क्लिक करा
“Construction Worker Apply Online for Claim” या पर्यायावर क्लिक करा.

3. New Claim निवडा
त्यानंतर New Claim या पर्यायावर क्लिक करा.

4. रजिस्ट्रेशन नंबर आणि OTP भरा

  • तुमचा Registration Number टाका

  • नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून Validate OTP करा

5. फॉर्ममध्ये माहिती भरा

  • तुमचा Registration Status, Name, आधार, इतर माहिती फॉर्ममध्ये येईल

  • Bank Details ही कामगाराच्या नावावर असावी

6. योजना निवडा

  • Scheme Category: Education Welfare Scheme

  • त्यानंतर स्कॉलरशिप योजना निवडा

  • विद्यार्थ्याचं नाव, आधार नंबर, वर्ग, शाळेचं नाव, पत्ता, बोर्ड आणि वर्ष लिहा

7. कागदपत्र अपलोड करा
वरील सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

8. कागदपत्रे व्हेरिफाय करा

  • Do you verify documents?Yes करा

  • Click to load visiting dates → कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख निवडा

9. Submit करा आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा

  • Submit केल्यावर Acknowledgement Number मिळेल – जतन करा

  • Print Appointment Letter क्लिक करा

10. कामगार सुविधा केंद्राला भेट द्या
अपॉइंटमेंटच्या दिवशी हे लेटर आणि मूळ कागदपत्रांसह भेट द्या.

है पन वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘ताळपत्री खरेदीवर ५०% अनुदान’ मिळवा – अर्ज सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती


अर्ज करताना घ्यायची काळजी

  • रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल फॉर्म भरताना ऍक्टिव्ह असणं गरजेचं

  • विद्यार्थ्याचं नविन वर्गात प्रवेश असावा

  • सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि पूर्ण भरलेली असावीत

  • कामगाराचं बँक खातेच द्यावं – विद्यार्थ्याचं चालणार नाही

Leave a Comment