मित्रांनो, अलीकडे अनेकांना मोबाईलवर एक मेसेज आला आहे. त्यामध्ये सांगण्यात आलंय की “तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार असून त्यासाठी फक्त 55 रुपये भरावे लागतील.” आणि अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका अशा ठिकाणी जावे लागेल.
हा मेसेज पाहून अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी प्रश्न विचारले – “ही योजना खरी आहे का? लगेच 3000 रुपये मिळणार आहेत का?” चला तर मग याबद्दलची खरी माहिती जाणून घेऊया.
ही योजना नेमकी कोणासाठी आहे?
ही योजना केंद्र सरकारची असून ती ई-श्रम कार्ड धारक असंघटित कामगारांसाठी आहे.
म्हणजे ज्यांचे पीएफ अकाउंट नाही आणि जे नियमित नोकरीत नाहीत अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
ही योजना महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा विधवा पेन्शन यासारखी नाही.
है पण वाचा : दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी : तुकाराम मुंडे साहेबांनी दिल्या विशेष सूचना
पेन्शनची खरी प्रक्रिया
- ही योजना ताबडतोब 3000 रुपये देणारी नाही.
- यात सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- या वयोगटातील व्यक्तींनी दरमहा ठराविक हप्ता (EMI) भरावा लागतो.
- अर्जदाराने भरलेल्या रकमेइतकीच रक्कम केंद्र सरकारही जमा करते.
- अर्जदाराचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा 3000 रुपयांची पेन्शन सुरू होते.
55 रुपये EMI या मेसेजचा गैरसमज
मेसेजमध्ये सर्वांसाठी 55 रुपये असा उल्लेख आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही.
किती EMI लागेल हे तुमच्या वयानुसार ठरते.
उदाहरणार्थ – 18 वर्षाच्या तरुणासाठी EMI वेगळी असेल, तर 40 वर्षाच्या व्यक्तीसाठी वेगळी.
इतर पेन्शन योजनांपेक्षा फरक
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन यामध्ये लाभार्थ्यांना थेट मासिक रक्कम मिळते. यात कोणतेही हप्ते भरावे लागत नाहीत.
पण या योजनेत तुम्हाला सुरुवातीला काही काळ पैसे भरावे लागतात आणि त्यानंतर 60 वर्षांनंतर पेन्शन मिळते.
है पण वाचा : भजनी मंडळ अनुदान योजना 2025 – 25,000 रुपयांचे भांडवली अनुदान असा करा अर्ज
अर्ज कोठे करावा? | श्रमिक कार्ड योजना
ई-श्रम कार्ड धारकांनी अर्ज ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपंचायत किंवा महानगरपालिका येथे जाऊन करू शकतात.
महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा
- ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते.
- यातून लगेच 3000 रुपये मिळत नाहीत.
- 18 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्तींनाच सहभागी होता येते.
- EMI भरल्यावर आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते.
निष्कर्ष
- जर तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- मात्र लक्षात ठेवा – ही योजना दीर्घकालीन आहे, ताबडतोब पैसे मिळवून देणारी नाही.
- EMI किती लागेल, अर्ज प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती हवी असेल तर तुमच्या ग्रामपंचायत किंवा सरकारी कार्यालयात चौकशी करा.
अधिक अपडेट्ससाठी:
दररोजच्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा ( श्रमिक कार्ड योजना )