या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- महाडीबीटी पोर्टलवर जा: www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर जा.
- नवीन युजर असाल, तर रजिस्टर करा किंवा आधीच असलेला अकाउंट वापरून लॉगिन करा.
- NFSM अंतर्गत पाईप अनुदान योजना निवडा.
- आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.
हे सर्व पावले पूर्ण करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.