तक्रारीची माहिती भरा :

ज्यावेळी तुम्ही “Other” श्रेणी निवडता, तेव्हा तुम्हाला तुमच्या तक्रारीसंबंधी अधिक माहिती देण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक, पूर्ण नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, मतदार संघ, आणि पिन कोड यांसारखी माहिती भरावी लागेल. तुमच्याकडे जर कागदपत्रांचे पुरावे असतील, तर त्यांना अपलोड करा, अन्यथा ते टाकण्याची आवश्यकता नाही.

तुम्ही आपल्या तक्रारीचे थोडक्यात वर्णन करावं लागेल. एकदा तुमची तक्रार व्यवस्थित भरल्यावर, Submit बटणावर क्लिक करा.

6. तक्रारीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करा

तक्रार सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक Grievance नंबर प्राप्त होईल. हा नंबर तुम्ही तक्रारीच्या स्टेटसला ट्रॅक करण्यासाठी वापरू शकता.

7. तक्रारीची पुढील प्रक्रिया

तक्रारीची नोंदणी झाल्यानंतर संबंधित विभाग तपास करून तुमच्या तक्रारीवर कार्यवाही करेल. जर तुमचं हप्ते प्राप्त झाले नसेल तर ते लवकरच DBT पद्धतीने तुमच्या खात्यात जमा होईल.