नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : सातवा हप्ता कधी मिळणार? ताजं अपडेट जाणून घ्या | Namo Shetkari Status

Namo Shetkari Status : शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. अलीकडेच पीएम किसान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रश्न उपस्थित होतोय – “नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार?”

चला तर मग या संदर्भातील सर्व ताजी माहिती सविस्तर जाणून घेऊया.


 पीएम किसान हप्ता आणि नमो हप्त्याचा संबंध

  • पीएम किसान निधी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण 9 ते 10 दिवसांनी नमो हप्ता शेतकऱ्यांना मिळतो.

  • कारण, पीएम किसानचे लाभार्थी हेच नमो योजनेचे लाभार्थी असतात.

  • नुकताच पीएम किसानचा हप्ता वितरित झाला असून, केंद्र सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली आहे.

  • ही यादी आता अर्थमंत्रालयाकडे मंजुरीसाठी जाणार असून, त्यानंतर निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

 

है पण वाचा : Shetkari Karjmafi चा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या ताज्या अपडेट्स

 


अफवांना फाटा द्या | Namo Shetkari Status

काही ठिकाणी अशी अफवा पसरली आहे की नमो योजना बंद झाली असून, पुढे हप्ते मिळणार नाहीत.
➡️ मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे.
कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे की – सातवा हप्ता शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहे.


वार्षिक रक्कमेत बदल

  • निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना 15,000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

  • पण प्रत्यक्षात वार्षिक रक्कम 12,000 रुपयेच राहणार आहे.

  • यामध्ये 6,000 रुपये केंद्र सरकारकडून आणि 6,000 रुपये राज्य सरकारकडून दिले जातील.


पायाभूत सुविधा आणि भांडवली गुंतवणूक

नमो योजनेतील काही निधी राज्य सरकारने कृषी समृद्धी योजनेकडे वळवला आहे.

  • यावर्षी 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • पुढील पाच वर्षांसाठी तब्बल 25,000 कोटींची तरतूद आहे.
    ➡️ उद्देश – शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारणे आणि शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवणे.


 सातवा हप्ता कधी मिळू शकतो? | Namo Shetkari Status

  • अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

  • मात्र असा अंदाज व्यक्त केला जातोय की बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होऊ शकतात.

  • पण हे केवळ अंदाज असून, अधिकृत घोषणा होईपर्यंत खात्रीने सांगता येणार नाही.

 

है पण वाचा : शेळीपालन योजना 2025 शेतकऱ्यांना आता मिळणार 15 लाखापर्यंत अनुदान!

 


पात्र लाभार्थी व निधी

  • सातव्या हप्त्यासाठी साधारणतः 96 लाख शेतकरी पात्र असतील.

  • यात मागील हप्त्यांचे थकबाकीदार शेतकरी देखील समाविष्ट असतील.

  • पीएम किसानच्या डेट्यानुसार 92.81 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत.

  • या हप्त्यासाठी अंदाजे 1,900 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.

  • अर्थविभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.


निष्कर्ष – Namo Shetkari Status

म्हणजेच शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही. सातवा हप्ता नक्कीच मिळणार आहे.
सध्या प्रस्ताव अर्थमंत्रालयात असून, मंजुरी मिळाल्यानंतरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटची वाट पहा.


शेतकरी बांधवांसाठी खास सूचना

  • या विषयातील अधिक माहिती आणि लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे क्लिक करून पहा.

  • दररोजचे नवीन अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.

  • हा लेख/व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा.

Leave a Comment