Pipeline Yojana : पाईपलाईन योजना 2025 अर्ज कसा करायचा? कोणाला किती अनुदान? पूर्ण माहिती वाचा

Pipeline Yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे! महाडीबीटी पाईपलाईन योजना (Mahadbt Pipe Scheme 2025) अंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाईप खरेदीसाठी अनुदान दिलं जात आहे. या योजनेत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, घरबसल्या मोबाईलवरून आपण अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती.


कोण लाभ घेऊ शकतो? | Pipeline Yojana

या योजनेचा लाभ राज्यातील सर्व प्रवर्गातील पात्र शेतकरी घेऊ शकतात. पण प्रवर्गानुसार अनुदान रक्कम वेगळी आहे:

▶️ SC/ST प्रवर्गासाठी:

  • 100% अनुदान

  • कमाल मर्यादा ₹30,000

  • 428 मीटर पर्यंत पाईपसाठी पूर्ण अनुदान

 

है पन वाचा : महायुती सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा: कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

 

▶️ OPEN, OBC, SBC, VJNT यांच्यासाठी:

  • PVC Pipe साठी ₹35/मीटर

  • SDP Pipe साठी ₹50/मीटर

  • कमाल ₹15,000 पर्यंत

  • 428 मीटर पाईपपर्यंत अर्ज करता येतो


🖥️ अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस

  1. महाडीबीटी पोर्टल ओपन करा
    👉 https://mahadbt.maharashtra.gov.in

  2. “Farmer Scheme” वर क्लिक करा
    किंवा Google मध्ये “Mahadbt Farmer Login” टाका.

  3. Farmer ID वापरून लॉगिन करा
    ➡️ आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल.

  4. प्रोफाईल 100% पूर्ण करा
    (नाव, पत्ता, बँक डिटेल्स, शेतीची माहिती अपलोड करावी लागते)

  5. नवीन घटकासाठी अर्ज करायचा आहे
    → सिंचन साधने व सुविधा निवडा → पाईप ऑप्शनवर क्लिक करा

  6. Pipe Type निवडा

    • PVC Pipe

    • SDP Pipe

    • टब पाईप इत्यादी

  7. मोजमाप ठराविक टाका
    👉 फक्त 60 मीटर ते 428 मीटर पर्यंतच मान्य
    👉 उदाहरण: 428 मीटर चालेल, पण 450 मीटर नाही

  8. स्वयघोषणा करा
    → “मी अटी-शर्ती मान्य करतो” या बॉक्सवर क्लिक करा

  9. “बाब जतन करा” वर क्लिक करा
    → नंतर “मुख्य अर्ज सादर करा” या पर्यायावर क्लिक करा

  10. Fee भरा: ₹23.60 फक्त

    • Credit/Debit Card, UPI, Net Banking, QR Code

  11. Payment झाल्यावर अर्ज Final सादर होतो
    → “My Applied Schemes” मध्ये Status पाहता येतो

 

उद्याचे हवामान : राज्यात पावसाचं वातावरण तयार, पण मान्सून पुढे सरकत नाही – हवामान विभागाचा अपडेट

 


📑 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • 7/12 उतारा

  • शेताचे खाते उतारे

  • जातीचा दाखला (SC/ST साठी)

  • पाईपचे कोटेशन

  • स्वघोषणा फॉर्म

  • बँक पासबुक झेरॉक्स

  • मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला


🔍 माझा अर्ज कुठे आहे? – अर्ज स्थिती तपासण्याची प्रोसेस

  • जर तुम्ही पूर्वी अर्ज केला असेल, तर “Applied Schemes” मध्ये अर्जाचा स्टेटस पाहा

  • तुमचं नाव “निवड यादी” (Selection List) किंवा “प्रतीक्षा यादी” (Waiting List) मध्ये आहे का हे बघा

  • अर्ज फेटाळला गेला असेल तर नवीन अर्ज सादर करा

  • योजनेंतर्गत आता प्रथम अर्ज – प्रथम प्राधान्य (First Come, First Serve) हे धोरण आहे


📲 प्राथमिक सूचना – Pipeline Yojana

  • अर्ज करताना चुकीची मोजमापे टाकू नका (उदा. 429 मीटर चालत नाही)

  • एकाच वेळी एकापेक्षा जास्त घटकासाठी अर्ज करता येतो

  • Payment केल्यानंतर लगेच अर्ज सेव्ह होतो

  • अर्जाची प्रिंट किंवा रिसिप्ट तुम्ही नंतर डाउनलोड करू शकता

 

Soybean Biyane Yadi : सोयाबीन बियाणे लाभार्थी यादी आली, असे होईल वाटप

 


📌 निष्कर्ष – Pipeline Yojana

ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून, जलसिंचनाच्या माध्यमातून उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच सोपी असून, तुम्ही मोबाईलवरून घरी बसूनही अर्ज करू शकता.

📝 अर्ज करण्याची शेवटची तारीख शासनामार्फत घोषित केल्यानंतर वेबसाईटवर पाहावी ( Pipeline Yojana ) .

Leave a Comment