PMFBY Claim Status Check : रबी 2024 हंगामासाठी पीक विमा वाटप सुरू! शेतकऱ्यांचा मंजूर क्लेम बँक खात्यात जमा. नाव यादीत आहे का ते तपासा.
योजना काय आहे?
दरवर्षीप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, कीड किंवा रोगांमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी केंद्र शासन प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत शेतकऱ्यांना विमा भरपाई दिली जाते.
रबी हंगाम 2024 मध्ये हरभरा, कांदा यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या क्लेमचे परीक्षण करून आता मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागली आहे.
👨🌾 लाभार्थी कोण?
रबी 2024 मध्ये पीक विम्यासाठी अर्ज केलेले शेतकरी
पीक नुकसानीसाठी मंजूर क्लेम असलेले शेतकरी
आधार संलग्न बँक खातं असलेले शेतकरी
है पन वाचा : तुमचा PM Kisan हप्ता येणार आहे का? Beneficiary Status तपासण्यासाठी स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक
पीक विमा मंजूर झाला आहे का? कसं तपासाल?
ऑनलाइन पद्धत:
PMFBY अधिकृत पोर्टल (https://pmfby.gov.in) वर जा
वरच्या मेनूमध्ये Farmer Corner वर क्लिक करा
तुम्ही दोन पर्याय पाहाल:
शेतकरी लॉगिन
गेस्ट लॉगिन (लॉगिन न करता माहिती मिळवण्यासाठी)
लॉगिनसाठी:
मोबाईल नंबर टाका
कॅप्चा भरा
OTP मिळवून लॉगिन करा
लॉगिन केल्यानंतर:
हंगाम निवडा (उदा. Rabi 2024)
तुमचं पीक, सर्वे नंबर, क्लेमची स्थिती व मंजूर रक्कम दिसेल
अर्ज प्रक्रिया (पूर्वी केलीली):
बँकेमार्फत किंवा CSC केंद्रावरून पीक विम्यासाठी अर्ज
पीक नोंदणी, बँक तपशील, आधार कार्ड तपशील सादर
नुकसानानंतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सर्व्हे
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
7/12 उतारा
बँक पासबुक
पीक पेरणी प्रमाणपत्र
नुकसान प्रमाणपत्र (सरपंच/तलाठी साक्ष)
है पन वाचा : बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 2025: अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती
पात्रता:
शेतकऱ्याने विम्यासाठी अर्ज केलेला असावा
खरीप/रबी हंगामासाठी विमा प्रीमियम भरलेला असावा
पीक नुकसानीचे प्रमाण अधिकृतपणे नोंदवलेले असावे
महत्त्वाच्या तारखा:
टप्पा | तारीख |
---|---|
नुकसान अहवाल | मार्च 2024 पर्यंत |
क्लेम मंजुरी | जून 2024 |
रक्कम वितरण सुरुवात | जुलै 2025 पासून |
अधिकृत लिंक:
WhatsApp सेवा लिंक: (व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तपासा)
एक महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांनो, जर तुमची रक्कम अजून खात्यात आली नसेल तर घाबरू नका. वर दिलेल्या पद्धतीने तुम्ही तपासू शकता की तुमचा क्लेम मंजूर आहे का. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे उशीर होतो.