पोकरा योजना महाराष्ट्र : राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
पोकरा योजना (Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project) – योजनेचा दुसरा टप्पा (POCRA 2.0) 22 जून 2025 पासून सुरू होणार आहे.
राज्यशासनाने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. जर तुमचं गाव या योजनेसाठी पात्र असेल, तर तुम्ही अनुदानाचा लाभ घेऊ शकता.
कोणकोणते लाभ मिळणार आहेत? | पोकरा योजना महाराष्ट्र
पोकरा योजनेतून खालील घटकांवर शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार आहे:
🌱 फळबाग लागवड
🛖 शेततळे
🌿 शेडनेट व पॉलीहाऊस
🚜 ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चालित यंत्र
💧 नवीन विहीर
🔁 जुन्या विहिरीचं पुनर्भरण
है पन वाचा : शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ महत्वपूर्ण निर्णय
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी:
1️⃣ आधार कार्ड (Aadhar Card)
आधार कार्ड असणं आवश्यक आहे
मोबाईल नंबर आधारसोबत लिंक असणं गरजेचं आहे
जर लिंक नसेल, तर CSC सेंटरवर जावं लागेल
बायोमेट्रिक अपडेटसाठी आधार अपडेट करावं लागेल
2️⃣ सातबारा उतारा (7/12) व 8अ उतारा
जमीन आपल्या नावावर असल्याचा पुरावा
डिजिटल किंवा तलाठ्याच्या सही शिक्क्यासह चालतो
8अ उताराही तयार ठेवा
3️⃣ सामायिक खातेदारांची संमती (NOC) | पोकरा योजना महाराष्ट्र
जर जमीन सामायिक असेल
तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सहमतीपत्र आवश्यक
हे फक्त सामायिक जमिनीसाठी लागू आहे
4️⃣ बँक खातं (Bank Account)
NPCI सोबत लिंक असलेलं बँक अकाउंट आवश्यक
कारण अनुदान DBT (Direct Benefit Transfer) ने खात्यात जमा होणार
अर्ज कसा करायचा?
शेतकऱ्यांनी POCRA Portal वर रजिस्ट्रेशन करायचं आहे.
हे रजिस्ट्रेशन अगदी महाडीबीटीसारखंच (mahaDBT) असणार आहे.
प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी कागदपत्रं लागणार आहेत.
उदाहरणार्थ:
फळबागसाठी वेगळी प्रक्रिया
विहिरीसाठी वेगळा अर्ज
ट्रॅक्टरसाठी वेगळी कागदपत्रं
महत्वाचं | पोकरा योजना महाराष्ट्र
तुमचं आधार आणि मोबाईल अपडेट आहे का? आधी ते तपासा
तुमचं बँक अकाउंट NPCI DBT ला लिंक आहे का? खात्री करा
सामायिक जमीन असल्यास आधीपासून NOC बनवा
डिजिटल सातबारा आणि 8अ ठेवा रेडी
कोण पात्र आहे?
राज्यशासनाने जी नवी यादी जाहीर केली आहे, त्यात समाविष्ट गावांतील शेतकरी
पोकरा टप्पा 2 साठी पात्र गावांमध्ये आधीच हालचाली सुरू आहेत
पात्रतेसाठी ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा
पुढचे पावले:
22 जून 2025 पासून पोर्टलवर अर्ज सुरू
प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे अर्ज
वेळोवेळी नवीन व्हिडिओ/सूचना मिळवण्यासाठी अधिकृत चॅनल किंवा वेबसाईट फॉलो करा
निष्कर्ष – पोकरा योजना महाराष्ट्र
पोकरा योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. फळबाग, शेततळे, विहीर, ट्रॅक्टर अशा अनेक बाबींवर थेट अनुदान मिळवण्यासाठी योग्य कागदपत्रं तयार ठेवा आणि वेळेत अर्ज करा.
सतत अपडेट राहा, पोकरा 2.0 पोर्टल सुरू होताच अर्ज करा आणि अनुदान मिळवा ( पोकरा योजना महाराष्ट्र ) .
ठिबक सिंचन योजना : सूक्ष्म सिंचनाची सुवर्णसंधी शेतकऱ्यांनो! मिळवा 90% पर्यंत अनुदान थेट खात्यात