सिल्क अन् मिल्क शेती माहिती : एका एकरातून महिन्याला दुहेरी कमाई! शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर संकल्पना संपूर्ण माहिती वाचा

सिल्क अन् मिल्क शेती माहिती : शेतीमध्ये नवे पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘सिल्क अ‍ॅण्ड मिल्क’ (Silk & Milk) ही संकल्पना नवा उजेड देणारी ठरत आहे. तुतीची लागवड करून रेशीम कीटक पालन आणि दुग्धव्यवसाय यांचे एकत्रित नियोजन केल्यास शेतकऱ्याला दुहेरी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होतो. एका बाजूला रेशीम कोष विक्रीतून मासिक उत्पन्न मिळते, तर दुसऱ्या बाजूला गायींपासून होणाऱ्या दुधविक्रीतून दररोजचा नफा मिळतो

‘सिल्क अ‍ॅण्ड मिल्क’ संकल्पना म्हणजे काय? | सिल्क अन् मिल्क शेती माहिती

सिल्क अ‍ॅण्ड मिल्क’ म्हणजे तुती लागवड आणि दुग्धव्यवसाय यांचा समन्वय. यात शेतकरी तुतीची झाडं लावतात आणि त्यावर रेशीम कीटक (Silkworms) पालन करतात. यामधून मिळणारे कोष विकून दर महिन्याला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्याचबरोबर गायींच्या दुधविक्रीतून दररोजचे आर्थिक उत्पन्न मिळते.</p> <p>ही एक आधुनिक संकल्पना असून तिचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न निश्चितपणे वाढू शकते.

 

है पन वाचा : जमीन दस्त नोंदणीतील फेरफार प्रक्रिया होणार जलद; अनावश्यक हरकती फेटाळण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

 

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन ‘सिल्क अ‍ॅण्ड मिल्क’ संकल्पनेचा स्वीकार केला आहे. एका एकर जमिनीत तुती लागवड करून ते रेशीम कोष उत्पादन करतात. या शेतीतून दरमहा ₹15,000 ते ₹20,000 पर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्याच वेळी 2 ते 3 गायींपासून दररोज ₹800 ते ₹1000 पर्यंतचे उत्पन्न मिळते.</p> <p>या दुहेरी कमाईच्या मॉडेलमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुधारला असून त्यांच्या शेतीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे.

तुतीचे फायदे आणि खाद्यखर्चात बचत | सिल्क अन् मिल्क शेती माहिती

तुतीच्या झाडांपासून मिळणाऱ्या काड्या गायींच्या खाद्यात मिसळल्यास सुमारे 30 टक्के खाद्यखर्चात बचत होते, असे शेतकऱ्यांचे अनुभव सांगतात. यामुळे केवळ खर्च कमी होत नाही तर दुधाचा दर्जाही सुधारतो. हे खाद्य नैसर्गिक असल्यामुळे गायींचे आरोग्यही टिकून राहते.

रेशीम शेतीमुळे रोजगार आणि स्वयंपूर्णता

रेशीम शेतीमुळे केवळ उत्पन्नच वाढत नाही, तर ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची संधीही उपलब्ध होते. रेशीम कोष उत्पादनाच्या प्रक्रियेत स्थानिक महिलांना रोजगार मिळतो, तर काही शेतकरी स्वतःचे रेशीम प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा विचार करत आहेत. ही प्रक्रिया स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरते.

सरकारी योजनांचा लाभ घ्या | सिल्क अन् मिल्क शेती माहिती

रेशीम शेती आणि दुग्धव्यवसायासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. नॅशनल सिल्क मिशन (NSM), प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुग्ध व्यवसायासाठी पशुसंवर्धन अनुदान योजना यांचा लाभ घेऊन शेतकरी आपला व्यवसाय वाढवू शकता.

 

तूर लागवड माहिती : एकरी 18 क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्याची संपूर्ण माहिती

 

शेतकऱ्यांसाठी संदेश

जमिनीचा योग्य वापर, संसाधनांचे योग्य नियोजन आणि विविध क्षेत्रांचा संगम करून ‘सिल्क अ‍ॅण्ड मिल्क’ ही संकल्पना शेतीतील नवा अध्याय ठरू शकते. कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्याची ही अत्यंत फायदेशीर आणि शाश्वत पद्धत आहे.

निष्कर्ष – सिल्क अन् मिल्क शेती माहिती

सिल्क अ‍ॅण्ड मिल्क’ म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्थिर, सुरक्षित आणि नफेखोर शेती मॉडेल.</strong> तुती लागवड व दुग्धव्यवसायाचा समन्वय साधल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. बुलढाणा जिल्ह्यातील यशोगाथा हेच दर्शवतात की ही संकल्पना भविष्य घडवणारी ठरणार आहे.

Leave a Comment