Vima Sakhi Yojana Maharashtra : विमा सखी योजना 2025 अंतर्गत 2 लाख महिलांना दरमहा ₹7000 मिळतात. एलआयसीची स्टायपेंड योजना आणि करिअर संधी जाणून घ्या.
विमा सखी योजना 2025: महिलांना आर्थिक सशक्ततेकडे वाटचाल
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी भारत सरकार आणि एलआयसीने एक अभिनव पाऊल उचलले आहे – विमा सखी योजना. या योजनेंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे, आणि या महिलांना दरमहा ₹7000 पर्यंत स्टायपेंड दिलं जातं. ही योजना केवळ आर्थिक मदत देत नाही, तर महिलांना दीर्घकालीन करिअर संधी देखील उपलब्ध करून देते.
विमा सखी योजना काय आहे?
2024 साली भारत सरकारने विमा सखी – महिला करिअर एजंट (MCA) योजना सुरू केली. एलआयसीच्या माध्यमातून महिलांना जीवन विमा क्षेत्रात करिअरची संधी मिळवून देणारी ही योजना आहे. यामध्ये प्रशिक्षण, स्टायपेंड आणि भविष्यातील भरतीसाठी मार्ग खुला होतो.
योजनेचे वैशिष्ट्य | Vima Sakhi Yojana Maharashtra
देशभरातील 2,05,896 महिलांनी नोंदणी केली आहे.
दरमहा ₹7000 स्टायपेंड पहिल्या वर्षासाठी मिळतो.
दुसऱ्या वर्षी ₹6000, तर तिसऱ्या वर्षी ₹5000 स्टायपेंड दिला जातो.
एलआयसीकडून कमिशन व्यतिरिक्त स्टायपेंडची रक्कम मिळते.
एलआयसी विविध कामगिरी-आधारित प्रोत्साहन देखील देते.
5 वर्ष सेवा पूर्ण केल्यास, महिलांना ADO पदासाठी पात्रता मिळते.
है पण वाचा : शेतकऱ्यांनो, ‘या’ खात्यात जमा होतो पीकविमा आणि अनुदान! मोबाईलवरच तपासा संपूर्ण डिटेल्स
लाभार्थी कोण?
पदवीधर महिला (Graduates)
विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिला
18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला
पात्रता अटी
भारताची महिला नागरिक असावी.
किमान पदवीधर असणे आवश्यक.
संगणक व मोबाईल वापरण्याचे प्राथमिक ज्ञान असावे.
विक्री कौशल्य आणि संवाद कौशल्य असणे फायदेशीर.
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
जिल्हा/तालुका स्तरावरील एलआयसी शाखेमध्ये संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी फॉर्म भरावा.
एलआयसीच्या अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण घेतले जाते.
यशस्वी प्रशिक्षणानंतर विमा सखी म्हणून नियुक्ती केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
शैक्षणिक प्रमाणपत्र
बँक पासबुक (IFSC कोडसह)
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर व ईमेल आयडी
महत्त्वाच्या आर्थिक बाबी
2024-25 मध्ये ₹62.36 कोटी स्टायपेंड विमा सखींना वितरित.
2025-26 साठी ₹520 कोटीचे बजेट मंजूर.
त्यापैकी 14 जुलै 2025 पर्यंत ₹115.13 कोटी वितरित.
प्रशिक्षण व करिअर संधी
विमा सखींना 3 वर्षांचे प्रशिक्षण व स्टायपेंड मिळतो.
5 वर्षांनंतर, पात्र महिलांना LIC च्या ADO (Apprentice Development Officer) भरतीत सहभागी होता येते.
या व्यतिरिक्त, विमा सखी म्हणून कामगिरीनुसार कमिशन व बोनसही मिळतो.
है पण वाचा : दरवर्षी ₹२४,००० जमा केल्याने तुम्हाला ११ लाखांपेक्षा जास्त मिळतील, संपूर्ण माहिती आणि व्याजदर जाणून घ्या
अधिकृत माहिती व संपर्क
योजना सुरूवात तारीख: 9 डिसेंबर 2024
अधिकृत संस्था: एलआयसी (LIC of India)
अधिकृत संकेतस्थळ: https://licindia.in
निष्कर्ष
विमा सखी योजना ही मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारी आणि भविष्यातील सरकारी करिअरसाठी संधी निर्माण करणारी योजना आहे. दरमहा स्टायपेंड, ELearning आणि एलआयसीमार्फत ADO पदासाठी पात्रता ही तिची मोठी वैशिष्ट्ये आहेत. आपण पदवीधर असाल, आणि आर्थिक सशक्तता मिळवायची असेल तर ही योजना तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते ( Vima Sakhi Yojana Maharashtra ) .: