Ativrushti Nuksan Bharpai List : राज्यात 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली होती. अखेर आता शासनाने नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी दिली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई?
अतिवृष्टी, गारपीट किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे
जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल किंवा मे 2024 मध्ये KYC प्रक्रिया पूर्ण केलेले शेतकरी
ज्यांचा अर्ज मंजूर असून अजून पैसे मिळालेले नाहीत
किती रक्कम वाटप होणार आहे?
एकूण नुकसान भरपाई: 445 कोटी रुपये
यापैकी 200 कोटी वाटप झालेले
आता उर्वरित 245 कोटी रुपये वाटप सुरू
जिल्ह्यावार लाभार्थी शेतकरी कोण?
सर्वात जास्त शेतकरी पुढील जिल्ह्यांतील आहेत:
यवतमाळ
बुलढाणा
छत्रपती संभाजीनगर
जालना
चंद्रपूर
सातारा
सांगली
धाराशिव
सोलापूर
नाशिक (अहिल्यानगर)
✅ याशिवाय इतर जिल्ह्यांतील पात्र शेतकरीसुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत.
KYC केले, पण पैसे नाही मिळाले?
तुम्ही जर KYC पूर्ण केले असेल पण अद्याप पैसे मिळाले नसतील, तर चिंता करू नका. आता MS Disaster Portal पुन्हा सुरू करण्यात आले आहे आणि खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
फळबागा व उन्हाळी पिकांचे नुकसान – नवीन भरपाई येणार
एप्रिल-मे महिन्यात झालेले नुकसान:
अंदाजे 75,000 हेक्टर क्षेत्र बाधित
फळबागा आणि उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान
यासाठी नवीन 213 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर
अधिकृत GR आणि यादी कशी पाहाल?
👇👇👇
1) जून, 2023 ते डिसेंबर, २०२4 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर
👉 GR आणि यादीसाठी येथे क्लिक करा
2) जून ते ऑक्टोबर, 2024 (मुख्यत: माहे ऑगस्ट व सप्टेंबर ) या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत
👉 GR आणि यादीसाठी येथे क्लिक करा
3) खरीप-2025 पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीबाबत
👉 GR आणि यादीसाठी येथे क्लिक करा
4) नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या घरांच्या पडझडींच्या अनुषंगाने घरांच्या दुरुस्तीकरिता / पुनर्बांधणीकरिता आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना निधी वितरीत करण्याबाबत.
👉 GR आणि यादीसाठी येथे क्लिक करा
5) जुलै ते ऑक्टोबर, 2024 (मुख्यत: माहे सप्टेंबर व ऑक्टोबर) या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत…
👉 GR आणि यादीसाठी येथे क्लिक करा
6) जून ते सप्टेंबर, २०२4 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता.
👉 GR आणि यादीसाठी येथे क्लिक करा
7) मार्च 2024 या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत
👉 GR आणि यादीसाठी येथे क्लिक करा
8) जून, 2024 ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत…
👉 GR आणि यादीसाठी येथे क्लिक करा
महत्त्वाचं:
✅ तुमची KYC स्थिती आणि खात्यावर पैसे आले का हे लवकरच पोर्टलवर पाहता येईल.
✅ नवीन GR आणि यादी अपडेटसाठी तुम्ही आमच्या ब्लॉगला नियमित भेट द्या.
निष्कर्ष:
अखेर शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC केले आहे, त्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे. अजूनही यादी आणि GR अपडेट मिळत असल्यामुळे सतत माहिती घेत राहणे आवश्यक आहे.