Top 6 Hiwali Pike farmers: टॉप 6 हिवाळी पिके शेतकरी होणार मालामाल : नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आदेश निर्मले आपलं ताज्या मराठी बातम्या मध्ये स्वागत करतो. आज आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्या टॉप 5 हिवाळी पिके ची लागवड करावी तर त्याचीच आज आपण माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो या सप्टेंबर महिन्यामध्ये परतीचा पाऊस सुरू झालेला आहे तसेच पुढून येणार आहे हिवाळा या हिवाळ्यात प्लस सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला नेमकं कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून आपल्याला भरपूर उत्पादन मिळेल या पोस्टमध्ये मी तुम्हाला आज टॉप पाच महत्त्वाचे पिकाचे नाव सांगणारे आहे.
नेमके ही पाच पिके कोणती आहेत. तर शेतकरी मित्रांनो तर सुरुवातीला लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पिकांची लागवड आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे एक तर वाटपाल्याने त्याचबरोबर दुसरी पद्धत ड्रीप , बेड आणि मंचींग याचा वापर करणे गरजेचे आहे काही वेळेस आपल्याला रेन पाईप आणि पिंक कलर याचा पण वापर करायचा आहे तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मालामाल करणारे पहिले म्हणजे
Top 6 Hiwali Pike farmers
Table of Contents
- Top 6 Hiwali Pike farmers
- 1) मिरची लागवड
- 2 ) भेंडी लागवड
- 3) गवार लागवड
- 4) मेथी लागवड
- 5) कोथिंबीर लागवड
- 6) पावटा लागवड
- निष्कर्ष
1) मिरची लागवड
होय शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड करताना अनेक जण व्हायरस, बोकड्या रोग, तसेच थंडीमुळे उत्पादन येणार नाही या भीतीमुळे लागवड करायला घाबरतात. परंतु, योग्य व्यवस्थापन केल्यास मिरचीचे उत्पादन चांगले मिळू शकते. मिरची लागवड करताना बेडवर मल्चिंग आणि ड्रिप सिंचन करणे खूप महत्त्वाचे असते.
मिरचीच्या लागवडीसाठी योग्य वाण निवडणे महत्त्वाचे आहे. एके 47, बनार, ज्वेलाल, फ्रायडे 151, नवल, अंकुर 930 अशा जातींची निवड करता येते. त्याचप्रमाणे, तुमच्या भागातील मागणी लक्षात घेऊन तलवारसारख्या इतर स्थानिक मिरची वाणांची लागवडही करता येईल.
मिरचीच्या सुधारित आणि प्रगत जातींचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
VNR राणी 332 F1 संकरित मिरची
- राणी 332 F1 हायब्रीड मिरची ही एक प्रगत जात असून, उच्च उत्पादन आणि उत्तम गुणवत्तेसाठी ओळखली जाते.
- या वाणाचे उत्पादन खूप चांगले असते, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवता येतो.
- याची वाढ जलद होते, त्यामुळे लवकर काढणी करता येते.
- या मिरचीमध्ये मसालेदारपणा जास्त असतो.
- मिरची मऊ आणि चमकदार दिसते.
- पहिली काढणी ४५ ते ५० दिवसांमध्ये करता येते.
- मिरचीचे रंग मध्यम हिरवे असतात.
- मिरचीची लांबी 12 ते 14 सेमी असते आणि जाडी 1 ते 2 सेमी असते.
- या वाणाचे उत्पादन तीनही हंगामांमध्ये (खरीप, रब्बी आणि जायद) घेता येते.
मिरची लागवड करताना योग्य जातीची निवड, योग्य व्यवस्थापन, आणि पाणी व्यवस्थापनावर भर दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
है पण वाचा : हरभरा सुधारित जाती 2 एकरात 30 क्विंटल हरभरा
2 ) भेंडी लागवड
होय शेतकरी मित्रांनो, तुम्हाला भेंडीची लागवड करायची असल्यास, हे उत्पादन पेरणीनंतर अंदाजे 40 ते 45 दिवसांत सुरू होते. बाजारात जर भेंडीला चांगला भाव मिळाला तर, किमान 15 ते 30 किंवा 40 रुपये प्रति किलो भाव मिळू शकतो, जो एक विक्रमी तोड आहे.
भेंडीची पुसा ए-४ ही सुधारित जात अनेक गुणांनी श्रेष्ठ आहे. ही जात ऍफिड आणि जॅसिड सारख्या कीटकांचा प्रभावीपणे सामना करते आणि पिवळ्या शिरा मोझॅक विषाणूला प्रतिरोधक आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची आणि किंचित हलक्या रंगाची असतात. तसेच, ही भेंडी कमी चिकट असते. पेरणीनंतर साधारण 45 दिवसांत फळे येऊ लागतात.
परभणी क्रांती – भेंडीची ही जात पिवळ्या शिरा मोझॅक विषाणूचा सामना करण्यास सक्षम आहे. बिया लावल्यानंतर सुमारे ५० दिवसांनी या जातीची फळे दिसू लागतात. परभणी क्रांती जातीची भेंडी गडद हिरव्या रंगाची असते, आणि साधारणपणे 15 ते 18 सें.मी. लांब असते.
3) गवार लागवड
होय, शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी साधारणपणे डिसेंबर महिन्यापासून गवार या पिकाची लागवड करतात. परंतु, जर तुम्ही सध्या या पिकाची लागवड केली, तर कमी खर्चात, कमी भांडवलात, कमी फवारणी आणि कमी खत-औषधांच्या वापरासह तुम्हाला भरघोस उत्पादन मिळू शकते. गवार हे पीक कमी खर्चात येते, त्यामुळे तुम्हाला कमी कष्टात चांगले उत्पादन मिळते.
दुष्काळ आणि रोग प्रतिरोधक विविधता
RGC-1031 ही गवारची एक विशेष जात आहे, जी दुष्काळग्रस्त भागांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या जातीमध्ये दुष्काळ व रोगांना सहन करण्याची क्षमता आहे. या जातीचे दाणे मध्यम आकाराचे आणि गुलाबी रंगाचे असतात. या जातीचा कालावधी 100-115 दिवसांचा आहे आणि हे पीक प्रति हेक्टर 10-15 क्विंटल उत्पादन देते. फुले फिक्कट गुलाबी रंगाची असतात आणि साधारणपणे पेरणीनंतर 40-50 दिवसांत येतात. याच्या शेंगांची लांबी व जाडी मध्यम असते.
HG-2-20 पावसावर आधारित वाण
HG-2-20 हा गवारचा एक पावसावर आधारित वाण आहे. चांगल्या पावसात या जातीचे उत्कृष्ट उत्पादन मिळते. या जातीची पाने खडबडीत आणि दाणे जाड असतात, तसेच शेंगा लांब असतात. हे पीक पेरणीनंतर साधारण 90-100 दिवसांत तयार होते आणि एकरी ८ ते ९ क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाचे विशेष गुणधर्म म्हणजे ते तुषार आणि पाणी कुजण्याच्या रोगास प्रतिरोधक आहे.
सर्वाधिक उत्पन्न देणारी जात
RGC-1038 ही गवारची सर्वाधिक उत्पन्न देणारी जात आहे. या जातीचा कालावधी 100-110 दिवसांचा आहे. या जातीची पाने खडबडीत आणि कापलेली असतात. या जातीची उत्पादन क्षमता प्रति हेक्टर 15-20 क्विंटल आहे. याच्या शेंगा मध्यम लांबीच्या असून, या पिकात भरपूर प्रथिने आढळतात.
4) मेथी लागवड
मेथी लागवड 30 ते 35 पीक आसून. 30 ते 35 दिवसांमध्ये आपलं वावर मोकळ होऊन जातं आणि मेथी पिकाचा आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं मेथी पिकासह बियाणे घेताना आपण डॉलर लाल कोरच हे बियाणे निवडू शकतो 777 किंवा दीपक या व्हरायटी आपण निवड करू शकतो प्रति एकरासाठी आपल्याला 40 ते 60 किंवा 80 किलो आपल्या टाकण्यानुसार किंवा पेरण्यानुसार पडतं त्यामुळे तुम्ही मेथी पिकाचे लागवड करीत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला प्रतिजोडा मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस रुपये तरी बाजार भाव मिळाला तरीही आपला शेतकरी मालामाल होणार आहे.
5) कोथिंबीर लागवड
होय शेतकरी मित्रांनो डक 35 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मालामाल करणार हे पीक कोथिंबीर पिकाच्या काही व्हरायट्या सांगायच्या झाल्या तर 25 दिवसांमध्येच उत्पादन देतात आणि जास्त उत्पादन झालेलं बघायला मिळत. कोथिंबीर पिकाला सध्याच्या टायमाला बाजार भाव दोनशे रुपये कट्टी जोडा बघायला मिळतो निश्चित स्वरूपात या टायमाला तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड करा. आणि मालामाल व्हा.
6) पावटा लागवड
होय शेतकरी मित्रांनो आता तुम्ही पावटा लागवड करीत असाल तर दिवाळीमध्ये तुमचा बरोबर पावटा चालू होणार आहे आणि 100 ते 120 रुपये किलो बाजार भाव या पावट्याला झालेला आहे हे आपल्याला बाजारात बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये सहा टॉप पिकाची माहिती दिलेली आहे. त्यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड तुम्ही करीत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस असे उत्पादन झालेलं तुम्हाला बघायला मिळणार आहे.
Also Read
पण लक्षात घ्या तुम्हाला मी फक्त हे पीक सांगितलेले आहे पिकाची लागवड फवारण्या खत औषध नियोजन कसं करायचं याची माहिती तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर वेळेवर देण्यात येईल जर व्हाट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. त्यामुळे आत्ताच सप्टेंबर महिन्यामध्ये नियोजन करा आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात मालामाल व्हा त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर आपली माहिती तुम्हाला आवडली मराठी बातम्या 24 तास या ग्रुपला जॉईन.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ): ऑक्टोबर महिन्यातील टॉप 6 हिवाळी पिके
- सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोणती पिके लावावी ज्यामुळे जास्त नफा मिळेल?
उतर: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जास्त उत्पन्न देणारी सहा प्रमुख पिके आहेत:
- मिरची
- भेंडी
- गवार
- मेथी
- कोथिंबीर
- पावटा
2. हिवाळ्यात मिरची पीक फायदेशीर का आहे?
उतर: योग्य व्यवस्थापन, ड्रिप सिंचन, आणि मल्चिंगचा वापर करून मिरची थंडीच्या काळात देखील चांगले उत्पादन देते. एके 47, बनार, ज्वेलाल, आणि VNR राणी 332 F1 अशा प्रगत जातींचा वापर केल्यास अधिक नफा मिळवता येतो.
3. भेंडी लागवड करताना कोणत्या जातींची निवड करावी?
उतर: भेंडीसाठी पुसा ए-4 आणि परभणी क्रांती या जाती उत्तम आहेत. या जाती पिवळ्या शिरा मोझॅक रोगाला प्रतिरोधक आहेत आणि चांगले उत्पादन देतात.
4. गवार लागवड का फायदेशीर आहे?
उतर: गवार कमी खर्चात आणि कमी दिवसात येणारे पीक आहे. RGC-1031 आणि HG-2-20 या जाती दुष्काळ व रोग प्रतिरोधक आहेत, आणि कमी पाण्यात भरपूर उत्पन्न देतात.
5. मेथी लागवड किती दिवसांत तयार होते?
उतर: मेथी पीक 30 ते 35 दिवसांत तयार होते. डॉलर लाल कोरच आणि 777 दीपक या जातींचा वापर केल्यास, कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळू शकते.
6. कोथिंबीर पीक लावल्यास किती दिवसांत उत्पादन मिळते?
उतर: कोथिंबीर 25 ते 35 दिवसांत तयार होते. सध्याच्या बाजारभावानुसार, कोथिंबीरला 200 रुपये कट्टीचा भाव मिळत आहे, जो शेतकऱ्यांसाठी चांगला नफा देणारा आहे.
7. पावटा पीक का लावावे?
उतर: पावटा पीक दिवाळीच्या सुमारास चांगले उत्पादन देते, आणि बाजारात त्याला 100 ते 120 रुपये प्रति किलो भाव मिळतो, जो शेतकऱ्यांना मोठा फायदा देतो.
8. लागवडीसाठी कोणती शेती तंत्रज्ञान वापरावे?
उतर: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पिकांची लागवड करताना वाटपाळ, ड्रीप सिंचन, बेड आणि मल्चिंग याचा वापर करावा. काहीवेळेस रेन पाईप आणि पिंक कलर प्लास्टिक यांचाही वापर केला जातो..
निष्कर्ष
शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये योग्य पिकांची निवड करून योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवता येईल. या लेखात दिलेल्या सहा प्रमुख पिकांपैकी कोणतेही एक निवडून तुमच्या शेतात लागवड करा आणि योग्य फवारणी, खताचे नियोजन यासारख्या शेतीतील अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून नफा वाढवा. वेळेवर केलेली लागवड आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला हिवाळ्यातील शेतीत मोठा फायदा देईल. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉइन व्हा आणि शेतीशी संबंधित ताज्या घडामोडी व शेतीचे अपडेट्स मिळवा.