Nuksan Bharpai : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा लवकरच मिळणार खरीप पीकविमा योजनेचा शेवटचा हप्ता

Nuksan Bharpai पुणे : पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिला जाणारा शेवटचा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राहिलेली नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


एकूण हप्त्याची माहिती | Nuksan Bharpai

राज्यात 2024 च्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेत एकूण ₹8063.56 कोटी रुपयांचा विमा हप्ता देणे अपेक्षित होते. बनावट अर्ज रद्द केल्यानंतर ₹400 कोटी रुपयांची बचत झाली, त्यामुळे हा हप्ता आता ₹7600 कोटी झाला आहे.

▪️ आतापर्यंत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारच्या अनुदानातून विमा कंपन्यांना ₹6584.92 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
▪️ उर्वरित ₹1000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांत वितरित केला जाणार आहे.

है पन वाचा : बच्चू कडूंचं अन्नत्याग उपोषण चौथ्या दिवशी बच्चू कडूंची लढाई सरकारविरुद्ध


भरपाईविषयी सविस्तर माहिती :

यंदाच्या हंगामात विविध प्रकारच्या नुकसानीवर आधारित ₹3802.42 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे.

नुकसान प्रकार आणि भरपाईचा तपशील | Nuksan Bharpai

नुकसान प्रकारभरपाई (₹ कोटी)
स्थानिक नैसर्गिक आपत्ती₹2569.07 कोटी
मध्य हंगामातील प्रतिकूलता₹707.60 कोटी
काढणी पश्चात नुकसान₹0.79 कोटी
पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान₹6.45 कोटी
✅ वितरित भरपाई₹3283.91 कोटी
❌ उर्वरित भरपाई (प्रलंबित)₹518.91 कोटी

▪️ उर्वरित ₹518.91 कोटी भरपाईचा वितरण उर्वरित ₹1000 कोटी हप्त्यानंतर होणार आहे.
▪️ शेवटचा हप्ता वितरित झाल्यावर ही प्रलंबित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.


कंपन्यांचा नफा आणि परतावा :

▪️ पीकविमा कंपन्यांशी झालेल्या करारानुसार नुकसान भरपाई वगळता उरलेल्या रकमेच्या 20% रक्कम कंपन्यांचा नफा म्हणून धरली जाते.

▪️ यंदा शेतकऱ्यांना ₹3802.42 कोटी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
▪️ अंदाजे ₹3800 कोटी शिल्लक राहतात.
▪️ त्यातील 20% म्हणजे ₹760 कोटी नफा कंपन्यांना.
▪️ उर्वरित ₹2300 कोटी रुपये राज्य सरकारला परत मिळणार आहेत.


शेवटचा हप्ता कोणत्या टप्प्यावर? | Nuksan Bharpai

▪️ कृषी विभागाकडून शेवटच्या हप्त्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
▪️ हा प्रस्ताव 2-3 दिवसांत मंजूर होण्याची शक्यता आहे.
▪️ मंजुरीनंतर ₹1000 कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना दिला जाईल.


कृषी विभागाकडून स्पष्टता :

▪️ उर्वरित प्रलंबित ₹518.91 कोटी भरपाई शेवटचा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना वाटप केली जाईल.
▪️ भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून जमा केली जाईल.

Tokan Yantra Subsidy Online Application : महाडीबीडी टोकन यंत्र अर्ज सुरू – शेतकऱ्यांना मिळणार 100% Subsidy, असा करा अर्ज


एक नजर महत्वाच्या मुद्द्यांवर :

✅ एकूण विमा हप्ता : ₹8063 कोटी
✅ बनावट अर्ज रद्द करून बचत : ₹400 कोटी
✅ सध्याचा हप्ता : ₹7600 कोटी
✅ आतापर्यंत दिलेले : ₹6584 कोटी
✅ राहिलेला हप्ता : ₹1000 कोटी (लवकरच)
✅ एकूण नुकसान भरपाई : ₹3802 कोटी
✅ उर्वरित परतावा (राज्य सरकारला) : ₹2300 कोटी


महत्वाचे Updates शेतकऱ्यांसाठी – Nuksan Bharpai

▶️ पीकविमा योजनेत भरपाई साठी अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरच मिळणार आहे.
▶️ बँक खातं आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.
▶️ अधिकृत SMS द्वारे अपडेट मिळणार.
▶️ तुमचे मोबाईल नंबर PMFBY पोर्टलवर अपडेट ठेवा ( Nuksan Bharpai ) .

Ration Card Mahiti : रेशन कार्डवर जूनमध्ये जास्त धान्य मिळणार

Leave a Comment