Soybean Anudan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांवर १००% अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेणार आहोत.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये | Soybean Anudan
योजना: सोयाबीन बियाणे १००% अनुदान योजना
लाभार्थी: महाराष्ट्रातील पात्र शेतकरी
अर्जाची पद्धत: ऑनलाईन (MahaDBT पोर्टलवर)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३ जून 2025
निवड प्रक्रिया: “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर
Ativrushti Nuksan Bharpai GR : अतिवृष्टी भरपाई बाबत शासनाचा मोठा निर्णय
पात्रता निकष
शेतकरी नोंदणी: MahaDBT पोर्टलवर नोंदणी आवश्यक.
जमिनीचे क्षेत्र: किमान २० गुंठे ते कमाल १ हेक्टर.
बियाण्याचा प्रकार: फक्त सोयाबीनसाठी.
इतर पिके: तूर, मूग, उडीद यांसाठी अर्ज आवश्यक नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया | Soybean Anudan
1. MahaDBT पोर्टलवर लॉगिन करा
https://mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवर जा.
“Farmer Login” वर क्लिक करा.
आपला “Farmer ID” आणि पासवर्ड टाका.
मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.
2. प्रोफाइल पूर्ण करा
प्रोफाइल १००% पूर्ण असणे आवश्यक आहे.
व्यक्तिगत माहिती, बँक खाते तपशील, जमीन माहिती इत्यादी भरा.
3. नवीन अर्ज करा | Soybean Anudan
“Apply Scheme” किंवा “नवीन अर्ज” या पर्यायावर क्लिक करा.
“बियाणे वितरण प्रात्यक्षिक” योजना निवडा.
“प्रमाणित बियाणे वितरण” हा घटक निवडा.
4. पिक आणि क्षेत्र निवडा
पिक प्रकारात “घडीत धान्य” निवडा.
“सोयाबीन” हे पिक निवडा.
क्षेत्रफळ ०.४० हेक्टर (एक एकर) टाका.
5. अर्ज सादर करा | Soybean Anudan
“अर्ज सादर करा” या बटणावर क्लिक करा.
अटी व शर्ती स्वीकारा.
अर्ज सबमिट करा.
6. पेमेंट प्रक्रिया
जर पेमेंट आवश्यक असेल, तर ₹23.60 चे पेमेंट करा.
नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI किंवा QR कोड वापरून पेमेंट करा.
Farmer Id Card Registration : शेतकरी ओळखपत्र नोंदणीसाठी शेवटची तारीख कोणती?
आवश्यक कागदपत्रे | Soybean Anudan
आधार कार्ड
७/१२ उतारा
बँक पासबुकची प्रत
पासपोर्ट साइज फोटो
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
महत्त्वाच्या सूचना
अर्ज सादर केल्यानंतर “My Applied Scheme” मध्ये अर्जाची स्थिती तपासा.
अर्ज “Under Scrutiny” किंवा “Approved” स्थितीत असल्यास, पुढील प्रक्रिया सुरू राहील.
अर्ज “Rejected” असल्यास, दिलेल्या कारणानुसार सुधारणा करून पुन्हा अर्ज करा.
अर्जाची अंतिम यादी ३ जून 2025 रोजी जाहीर होईल.
Pik Vima 2025 Kadhi Milnar : पोस्ट हार्वेस्ट नुकसान भरपाई कधीपासून मिळणार? | पीक विमा अपडेट
मदतीसाठी संपर्क – Soybean Anudan
अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास, आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी किंवा MahaDBT हेल्पलाइनशी संपर्क साधा.
शेतकरी मित्रांनो, ही सुवर्णसंधी गमावू नका. आजच MahaDBT पोर्टलवर लॉगिन करून आपला अर्ज सादर करा आणि १००% अनुदानाचा लाभ घ्या.