आजकाल सोशल मीडियावर एक गोष्ट खूपच चर्चेत आहे – Pithachi Girni Yojana Maharashtra लाडक्या बहिणींना मोफत योजना. या योजनेत महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, सोलर चूल आणि गॅस सिलिंडर मोफत देण्याचा दावा केला जातोय. लोकांमध्ये याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. बऱ्याच जणींना वाटतंय, “हे सगळं खरंच मिळतंय का? अर्ज कसा करायचा?”
मात्र, या सर्व गोष्टींच्या मागे काही गुन्हेगारी प्रवृत्ती सक्रिय असल्याचंही उघड झालंय. त्यामुळे आपण या योजनांचा लाभ घेण्याआधी योग्य माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला, यासंबंधी सविस्तर जाणून घेऊ.
शासनाच्या ‘लाडकी बहिण योजना’चा उद्देश
शासनाने ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सुरू केली आहे. यामध्ये महिलांच्या दैनंदिन गरजांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. काही ठिकाणी योजनेत वाढ करण्याचं आश्वासन दिलं जातंय.
याशिवाय, प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत महिलांना मोफत तीन गॅस सिलिंडर दिले जातात. या योजना महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी आहेत. परंतु, या योजनांच्या नावाखाली अनेक बनावट प्रकरणं समोर आली आहेत.
है पण वाचा : जनधन खाते धारकांना मिळणार 10 हजार रुपये | जाणून घ्या संपूर्ण माहिती
फसवणुकीची नवी पद्धत | Pithachi Girni Yojana Maharashtra
सोलर चूल, पिठाची गिरणी किंवा शिलाई मशीन मोफत मिळतंय असं सांगून लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत.
कसे होते फसवणूक?
- बनावट कॉल्स: काही लोक महिलांच्या नावावर बनावट रजिस्ट्रेशन करून त्यांना कॉल करतात.
“तुमचं मोफत पिठाची गिरणी योजनेत नाव आहे. ती मिळवण्यासाठी फक्त ट्रान्सपोर्ट खर्च ₹1500 भरावा लागेल,” असं सांगून पैसे उकळले जातात. - ऑनलाइन अर्ज फसवणूक: सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती करून अर्ज भरण्यासाठी ₹50-₹100 घेतले जातात. अर्ज मंजूर झाल्यानंतर जीएसटी किंवा इतर शुल्काच्या नावाखाली ₹500-₹1000 पर्यंत रक्कम उकळली जाते.
- सोलर योजनांची फसवणूक: सोलर फवारणी यंत्र, सोलर बॅटरी किंवा सोलर चूल मोफत मिळतंय, असं सांगून लोकांना गंडवले जाते.
अशा फसवणुकीपासून कसं वाचाल?
- तपासा आणि खात्री करा
कोणत्याही योजनेची माहिती अधिकृत शासकीय वेबसाईटवरूनच घ्या. फक्त सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका. - बनावट कॉल्सना उत्तर देऊ नका
जर कोणी तुम्हाला कॉल करून पैसे मागत असेल, तर तत्काळ त्याची तक्रार पोलिस ठाण्यात करा. - फसव्या लिंक क्लिक करू नका
अर्ज भरण्यासाठी पाठवलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. - शंका असल्यास चौकशी करा
संबंधित योजना खरोखर अस्तित्वात आहे का, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधा.
है पण वाचा : शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर – महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय!
मोफत योजनांच्या फायद्यांपेक्षा सावध राहणं महत्त्वाचं
आपल्या देशात अनेक चांगल्या योजना आहेत, पण त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्या लोकांचीही कमी नाही. मोफत मिळणाऱ्या गोष्टींच्या मागे कोणत्याही अटी-शर्ती लपलेल्या असतात का? याची शहानिशा करायला हवी.
“मोफत” हा शब्द लोकांना आकर्षित करतो, पण त्या “मोफत” मागे काहीतरी अडचण किंवा फसवणूक असते का, हे समजून घेणं गरजेचं आहे.
शेवटी एकच विनंती
फसवणुकीपासून सावध राहा. कोणत्याही अर्जामध्ये पैसे भरायच्या आधी योजना खरी आहे का, याची खात्री करा. जर कुठे फसवणूक होताना दिसली, तर पोलिस ठाण्यात किंवा सायबर सेलला कळवा.
लक्षात ठेवा, आपली जागरूकताच समाजातील अशा प्रकारच्या लुटारूंपासून वाचवू शकते.
धन्यवाद!